Friday, April 25, 2025
Homeनगरराज्यात 185 कारखान्यांकडून 225 लाख टन उसाचे गाळप

राज्यात 185 कारखान्यांकडून 225 लाख टन उसाचे गाळप

जिल्ह्यात 18 कारखान्यांकडून 25 लाख टन ऊस गाळप

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

यंदाच्या गळीत हंगामात राज्यातील 185 साखर कारखान्यांनी 17 डिसेंबर अखेर 225.05 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 184.97 लाख क्विंटल साखर निर्मिती केली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 8.22 टक्के इतका आहे.

- Advertisement -

दि.15 नोव्हेंबर पासून यंदाचा गळीत हंगाम सुरू झाला. राज्यातील 94 सहकारी व 91 खासगी अशा एकूण 185 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले आहेत.

नगर जिल्ह्यातील गाळप
नगर जिल्ह्यातील 11 सहकारी व 7 खासगी अशा 18 कारखान्यांनी 17 डिसेंबर अखेर एकूण 25 लाख 58 हजार 692 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 29 लाख 56 हजार 950 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 7.64 टक्के आहे. या पैकी 11 सहकारी साखर कारखान्यांनी 13 लाख 89 हजार 849 मे.टन उसाचे गाळप करून 10 लाख 88 हजार 510 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. तर 7 खाजगी साखर कारखान्यांनी 11 लाख 78 हजार 842 मे.टन उसाचे गाळप करून 8 लाख 67 हजार 440 क्विंटल साखर निर्मिती केली आहे. 15 डिसेंबर अखेर देशातील 472 साखर कारखान्यानी ऊस गाळप सुरू केले आहे. 472 साखर कारखान्यांनी 719.24 लाख मे.टन ऊस गाळप होऊन 60.85लाख मे.टन साखर निर्मिती झालेली आहे. देशाचा सरसरी साखर उतारा 8.46 टक्के आहे. सर्वाधिक गाळप उत्तर प्रदेशात 257.97 लाख टन इतके झाले आहे. महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर असून महाराष्ट्रात 207.41 लाख टन उसाचे गाळप झाले तर 162.65 लाख टन गाळपासह कर्नाटक तिसर्‍या स्थानावर आहे.

अ.नं. कारखाना ऊस गाळप साखर उत्पादन उतारा
मे. टन क्विंटल टक्के

1) ज्ञानेश्वर 2,41,649 1,82,200 9.53
2) संजीवनी 1,18,895 82,800 9.74
3) कोळपेवाडी 1,50,493 1,32,975 9.59
4) गणेश 37,250 25,400 7.47
5) अशोक 1,11,620 92,500 7.81
6) प्रवरा 1,39,050 80,200 5.73
7) श्रीगोंदा 1,18,110 1,14,925 9.78
8) संगमनेर 2,12,680 1,91,000 8.85
9) वृध्देश्वर 46,660 31,800 9.09
10) मुळा 1,26,510 90,150 7.35
11) अगस्ती 76,941 64,560 9.98
12) क्रांतीशुगर 92,330 92,085 10.2
13) अंबालिका 3,99,220 3,15,000 8.14
14) गंगामाई 2,54,430 1,29,850 8.32
15) गौरी शुगर 1,95,490 1,36,087 6.95
16) प्रसाद शुगर 1,12,810 1,06,800 9.53
17) बारामती अ‍ॅग्रो 76,291 66,010 8.59
18) ढसाळ अ‍ॅग्रो 48,221 21,708 8.92

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...