Sunday, May 19, 2024
Homeनगर530 साखर कारखान्यांकडून देशात 2878 लाख टन उसाचे गाळप

530 साखर कारखान्यांकडून देशात 2878 लाख टन उसाचे गाळप

नेवासा |तालुका प्रतिनिधी Newasa

यंदाच्या सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात देशातील एकूण 530 साखर कारखान्यांनी 15 मार्च 2023 अखेर देशात 2877.64 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 282.05 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केली आहे.देशातील सरासरी साखर उतारा 9.80 टक्के आहे.

- Advertisement -

ऊस गाळप व साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक 1020 लाख मेट्रिक टन तर उर्वरित भारतात सर्वात कमी (13.04 लाख मे.टन) ऊसाचे गाळप झालेले आहे.

या गळीत हंगामात 333.75 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. सन 2022-23 च्या गळीत हंगामात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार, हरियाणा, मध्यप्रदेश, पंजाब, तामिळनाडू, तेलंगाणा, उत्तराखंड व उर्वरित भारतातील 530 साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतले. 15 मार्चअखेर 196 साखर कारखान्यांचे हंगाम बंद झालेले असून एकूण साखर उत्पादन 282 लाख टन इतके झाले आहे.

देशातील 530 साखर कारखान्यांचे झालेले गाळप

राज्य कारखाने ऊस साखर साखर गाळप उत्पादन उतारा

लाख टन लाख टन टक्के

उत्तर प्रदेश 117 842 79.60 9.45

महाराष्ट्र 210 1020 102 10.00

कर्नाटक 73 526 53.10 10.10

गुजरात 16 84 8.70 10.30

आंध्रप्रदेश 5 18 1.70 9.65

बिहार 9 64 6.20 9.70

हरियाणा 14 56 5.20 9.25

मध्य प्रदेश 19 49 4.50 9.25

पंजाब 16 58 5.50 9.50

तामिळनाडू 29 83 7.95 9.60

तेलंगाणा 7 25 2.50 10.10

उत्तराखंड 8 40 3.90 9.70

उर्वरित भारत 7 13 1.20 9.29

एकूण 530 2878 282 9.80

- Advertisment -

ताज्या बातम्या