Friday, November 15, 2024
Homeनगरसाखर कामगारांसाठी लवकरच त्रिपक्षीय समिती स्थापन

साखर कामगारांसाठी लवकरच त्रिपक्षीय समिती स्थापन

साखर कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाला उपमुख्यमंत्री पवार यांचे आश्वासन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कामगारांसाठी लवकरच त्रिपक्षीय समिती स्थापन करू ,असे आश्वासन दिल्याची माहिती साखर महासंघाचे उपाध्यक्ष शरदराव नेहे यांनी दिली. उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांना महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्यावतीने साखर कामगार त्रिपक्षीय समिती लवकरात लवकर स्थापन व्हावी, यासाठी अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थळावर महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी पवार यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे कोषाध्यक्ष शिवाजीराव कोठवळ, उपाध्यक्ष विलास वैद्य, रावसाहेब वाकचौरे, विजय देशमुख, संदीप मालुंजकर, प्रभाकर जाधव यांनी निवेदन दिले.

- Advertisement -

त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी लवकरात लवकर त्रिपक्षीय समिती गठित करू असा शब्द दिला. राज्यातील साखर कारखान्यातील कामगारांचे वेतन वाढीसाठी दर तीन वर्षांनी त्रिपक्षीय समितीची स्थापना केली जाते. या समितीमध्ये कारखाना मालक प्रतिनिधी तसेच सहकार खात्याचे प्रतिनिधी साखर आयुक्त व राज्यातील महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ असे राज्यव्यापी कामगारांचे वेतन वाढीसाठी समिती नेमली जाते व ती समिती साखर कामगारांच्या वेतन वाढीचा निर्णय करते.

मागील त्रिपक्ष समितीची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपलेली असून नवी त्रिपक्षीय समिती स्थापन करावी, अशी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाने मागणी केली आहे. या निवेदनावर महासंघाचे सहचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, शिवाजी कोठावळे, विलास वैधे, रावसाहेब वाकचौरे, विजय देशमुख, संदीप मालुंजकर, प्रभाकर जाधव यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या