मुंबई | प्रतिनिधी |Mumbai
राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा १४.०७ लाख हेक्टर क्षेत्र एकूण ऊस क्षेत्र गाळपासाठी उपलब्ध होणार असून ८८.५८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. यावर्षी ऊसाचे क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी कमी झाले आहे. निर्धारित केलेल्या दिनांकापूर्वी साखर कारखान्यांचे गाळप सुरू होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले….
Maratha Reservation : “सरकारला किती मुडदे पाडायचे आहेत”; मराठा आंदोलकाच्या आत्महत्येवर मनोज जरांगे पाटलांची प्रतिक्रिया
ऊस तोड कामगारांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी, मुला-मुलींच्या शिक्षणासाठी तसेच विविध योजनांचा लाभ देण्यासाठी साखर कारखान्यांकडून १० रुपये प्रति टन याप्रमाणे वसुली करून लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण महामंडळाला (Gopinath Munde to Sugarcane Cutting Workers Welfare Corporation) ही रक्कम देण्याचे यावेळी निर्णय झाला. या रकमेतून कामगारांच्या मुला-मुलींसाठी शाळा, वसतीगृह त्याचबरोबर कामगार हिताच्या योजना प्रभावीपणे राबवा, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी एफआरपी (FRP) बाबात समग्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले ‘हे’ महत्वाचे निर्णय
गेल्या वर्षी राज्यात २११ साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून १०५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा मात्र उसाचे क्षेत्र घटल्याने साखर उत्पादन ८८.५८ लाख मेट्रीक टन एवढे होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे . हंगाम २०२२-२३ मधील उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ उत्तरप्रदेश राज्याचा क्रमांक असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
Sanjay Raut : “ललित पाटील केवळ मोहरा, हिंमत असेल तर…”; राऊतांचे फडणवीसांना आव्हान
दरम्यान, मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पार पडलेल्या मंत्री समितीच्या बैठकीला (Meeting of Committee of Ministers) उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार प्रकाश सोळंके, आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी सदस्यांसह मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बैठकीत सादरीकरण केले.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची मुंबईत आत्महत्या