Tuesday, March 25, 2025
Homeनगरऊसतोड कामगारांनी धरली गावाकडील वाट!

ऊसतोड कामगारांनी धरली गावाकडील वाट!

साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

नगर जिल्ह्यातील बहुतांशी साखर साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला किंवा अंतिम टप्प्यात आहे. यामुळे जिल्ह्यात दाखल झालेल्या ऊस तोडणी कामगारांनी आता आपआपल्या गावाची वाटप पकडल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी हे ऊस तोडणी कामगार आपले बिर्‍हाड घेवून पुन्हा परतीच्या प्रवास करताना दिसत आहे.

- Advertisement -

भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली, तर गंगामाईसह इतर कारखान्यांचे गळीत हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आहेत. यंदा बहुतेक साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला उशिराने सुरुवात झाली परिसरात उसाचे प्रमाण कमी प्रमाणात असल्याने यंदा बहुतेक साखर कारखान्यांना गळीत हंगाम आटोपता घ्यावा लागला. साखर कारखान्यांचा पट्टा पडल्याने ऊसतोड कामगारांनी आपल्या गावाकडचा रस्ता धरला आहे. यंदा दीपावली पाठोपाठ विधानसभा निवडणुकीचे मतदान असल्याने ऊसतोड कामगारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर साखर कारखान्यांची वाट धरली यंदाचा गळित हंगाम पुरेशा उसाअभावी लवकरच आटोपता घ्यावा लागला.

परिसरात उसाची बर्‍यापैकी लागवड झाल्याने पुढील हंगामासाठी मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता असल्याने पुढील गळीत हंगाम वेळेत सुरू होण्याची ऊसतोड कामगारांना आस लागून राहिली आहे. ऊसतोड कामगार कारखान्याकडे ऊस तोडीला गेल्यानंतर त्यांच्या घरी देखभालीसाठी कुटुंबातील वयस्कर तसेच शाळकरी मुले थांबून राहतात, आता काम संपल्याने हे तोडणी कामगार पुन्हा गावाकडे निघाले आहेत. दुसरीकडे ज्या शेतकी गट ऑफिसच्या परिसरात ऊसतोड कामगारांनी तात्पुरत्या कोप्या उभारल्या होत्या. तो परिसर आता सुनासुना पडला आहे.

अतिक्रमण हटावमुळे शुकशुकाट
गावी परतणारे ऊसतोड कामगार काही ना काही खरेदी करून आपल्या गावाकडे रवाना होत असल्याने भातकुडगाव फाट्यापासून शेवगाव शहरातील अनेकांना या कालावधीत आर्थिक कमाई मिळत असताना अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील गजबजलेल्या क्रांती चौकासह प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाटाचे चित्र आहे. प्रत्येक वर्षीच्या हक्काच्या कमाईला यंदा व्यावसायिकांना मुकावे लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...