Sunday, November 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election 2024 : नांदगाव मतदार संघात सुहास कांदे विजयी; शिवसैनिकांचा...

Maharashtra Assembly Election 2024 : नांदगाव मतदार संघात सुहास कांदे विजयी; शिवसैनिकांचा जल्लोष

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यावर 89874 मतांनी दणदणीत विजय मिळवित‌ सलग दुसऱ्यांदा आमदार होत पंकज भुजबळ यांच्या विक्रमाची बरोबरी करत मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. आमदार कांदे यांनी मतदार संघात सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन इतिहास घडवला आहे.

- Advertisement -

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

शनिवारी सकाळी येथील इतर प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीत मतमोजणीस प्रारंभ झाला. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी करण्यात आली. टपाली मतमोजणी पासून आमदार सुहास कांदे यांनी आघाडी घेतली यामध्ये त्यांनी 811 मते घेत आघाडी घेतली मतमोजणीच्या पहिल्या 3950 लीडवर
फेरीपासूनच सुहास कांदे यांनी आघाडी घेतली होती. मतमोजणीची प्रक्रिया एकुण चौदा टेबलवर 25 फेऱ्यात पार पडली. पहिल्या फेरीपासून आमदार सुहास कांदे यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या पंचवीसव्या फेरीपर्यंत कायम ठेवली.

प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना अखेर पर्यंत पिछाडी भरून काढता आली नाही. आमदार सुहास कांदे यांना 138068 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना 48194 मते मिळाली. यामुळे भयमुक्त नांदगावच्या नाऱ्याला मतदारांनी सपसेल नाकारल्याचे दिसुन येते. मराठा महासंघाच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले डॉ रोहन बोरसे यांनी केवल 28108 तर उबाठा सेनेचे गणेश धात्रक यांना 22120 मते मिळाली. तर नोटाला ७७० मते पडली.

नांदगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे व जनतेची केलेली सेवा मतदार संघातील जनतेने मला मतदान रुपी पावती दिली.नांदगाव मतदार संघातील जनतेने माझ्यावर केलेली उपकारची मी त्यांनी केलेल्या मतदानाची जाणीव ठेऊन महायुतील घटक पक्षातील सर्वांचे आभार मानतो. महायुतीच्याघटक पक्षातील सर्व नेते, पदाधिकाऱ्या घेऊन मतदार संघातील राहिलेला विकास करणार असून यामध्ये प्रामुख्याने करंजवन पाणी पुरवठा, शिवसृष्टी ,भीमसृष्टी,78 खेडी पाणी पुरवठा , नांदगाव गिरणा धरणातून पाणी पुरवठा योजना आदी विकास कामे करण्यात येणार आहेत.

पुढील व्हिजन जलसिंचनासाठी
मतदार संघात प्रत्येकाच्या शेतात पाणीसाठी जलसिंचन प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येईल. तसेच मनमाड एमआयडीसी प्राधान्य देण्यात येणार असून महिला सक्ष्मीकरण करुन महिला रोजगार उपलब्ध करून प्रयत्न केले जाणार आहे…
सुहास कांदे, विजयी उमेदवार..

सुहास कांदे एकूण मते : 138068
समीर भुजबळ : 48194
डॉ रोहन बोरसे: 28108
गणेश धात्रक : 22120
आमदार सुहास कांदे एकूण 89874 मतांनी विजयी

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या