Saturday, May 18, 2024
Homeजळगावकांचनगरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

कांचनगरातील तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील कांचननगर (Kanchanagar) परिसरातील भैय्याची वखारजवळील चेतन हिरामण सोनवणे (Chetan Hiraman Sonawane) (सुतार) (वय-22) या तरुणाने दोरीने गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (Record of sudden death) करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील कांचन नगर (Kanchanagar) परिसरातील भैय्याची वखारजवळ चेतन सोनवणे हा वास्तव्यास आहे. आज दुपारच्या सुमारास तो घराजवळील मित्रांसोबत बसलेला होता त्यानंतर तो घरी निघुन गेला. सायंकाळ झाली तरी चेतन यांच्या घराचा दरवाजा बंद असून होत घराबाहेर देखील आला नसल्याने त्याच्या घराजवळ खेळणार्‍या त्याच्या काही मित्रांनी चेतनच्या घराचा दरवाजाच्यातून आत डोकावून बघितले. यावेळी त्यांना चेतन याने छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा (Suicide) संपविली होती. दरम्यान, घटनेची माहिती त्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शैलेश सपकाळे यांना कळताच त्यांनी लागलीच शनिपेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. काही वेळाच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन चेतनचा मृतदेह खाली उतरवून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.

आर्थिक परिस्थती हालाखीची

चेतन हा आई व मोठ्या भावासोबत राहत होता. त्याची आई हातमजूरी करुन त्यांचा उदनिर्वाह करते. चेतनचा मोठा भाऊ हा वेडसर असल्याने तो घरातून निघून गेला आहे. त्यामुळे चेतन हा आईसोबत राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती (Economic situation) अत्यंत हालाखिची आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

चेतन सोनवणे याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच त्याच्या आईने घरी धाव घेत एकच आक्रोश केला. चेतनच्या पश्चात आई, मोठा भाऊ, बहिण, जावाई असा परिवार आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या