Friday, May 3, 2024
Homeजळगावतरुणाची गळफास घेवून आत्महत्या

तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव – Jalgaon

शहरातील शिवाजीनगर येथे संजय रघुनाथ सपकाळे (वय २८) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संजय रघुनाथ सपकाळे हा घरी एकटा असतांना त्यांनी राहत्या घरात आज सकाळी ८.४५ वाजेपूर्वी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळाल्यावर शहर पोलीस स्टेशनेच राजेंद्र परदेशी यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले व तरुणास जिल्हा रुग्णालयात हलविले. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद बारी यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान सपकाळे या तरुणाने आत्महत्या का केली त्याचे कारण कळू शकलेले नाही. याप्रकरणी डॉ.मिलिंद बारी यांच्या खबरीवरुन शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास राजेंद्र परदेशी हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या