Monday, June 17, 2024
Homeजळगावरावेर तालुक्यात दाम्पत्याची आत्महत्या

रावेर तालुक्यात दाम्पत्याची आत्महत्या

रावेर | प्रतिनिधी
तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी पती व पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत रावेर व निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .पती पत्नीने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.खिरोदा प्र.रावेर येथे घटनास्थळी भुसावळ विभागाचे डीवायएसपी कृष्णकांत पिंगळे यांनी भेट दिली आहे.

- Advertisement -

मध्यप्रदेशातील बेलखेडा येथून शेती कामांसाठी मुक्ताईनगर तालुक्यात आलेल्या सुकलाल महेंद्रसिंग चव्हाण (वय-४४) याने निंभोरा पोलीस स्टेशनहद्दीत भोकर नदी जवळ एका बाभळीच्या झाडाला शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह दि.९ रोजी रविवारी आढळून आला. याबाबत निंभोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर खिरोदा प्र. रावेर गावाजवळील रसलपूर आभोडा रोडवरील कमलेश नत्थु महाजन यांच्या शेतात मुक्ताईनगर तालुक्यातील बेलखेडा येथील प्यारीबाई सुकलाल चव्हाण (वय ४२) या महिलेचा मृतदेह आढळून दि.१० रोजी सोमवारी आढळून आला.तिनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज उघडकीस आले असून, याबाबत शेतमालक कमलेश महाजन यांनी खबर अकस्मात मृत्यूची नोंद करणयात आली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक घनश्याम तांबे, तुषार पाटील हे.कॉ. सतिश सानप,सचिन घुगे,राहुल परदेशी यांनी धाव घेतली.दोघेही पती पत्नीचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे शवविच्छेदन डॉ. वैभव गिरी यांनी केले. दोघांचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी झाल्याचे गळफास झाला असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या