Monday, May 27, 2024
Homeजळगावधरणात उडी घेत शेतकऱ्याची आत्महत्या

धरणात उडी घेत शेतकऱ्याची आत्महत्या

रावेर|प्रतिनिधी Raver

विटवा (ता.रावेर)येथील ४७ वर्षीय शेतकऱ्यांने हतूनर धरणाच्या बॅकवाटर मध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सव्वा आठ वाजता उघडकीस आली.याबाबत निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

येथील सुभाष विठ्ठल चौधरी वय ४७ यांनी विटवा गावानजीक हतूनर धरणाच्या बॅकवाटर पाण्यात आत्महत्या केल्याची घटना रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.ते दुपारी पाच वाजेपासून घरातून निघून गेले होते,रात्री उशिरा शोध-शोध केली असता त्यांचे कपडे व बूट पेरूच्या मळ्याजवळ आढळून आल्यावर गावातील मासेमारी करणाऱ्या युवकांच्या मदतीने शोध घेतला,त्यांचा मृतदेह मिळून आला.याबाबत निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या