Thursday, May 15, 2025
Homeधुळेतापीत उडी घेत टेंभेतील तरूणाची आत्महत्या

तापीत उडी घेत टेंभेतील तरूणाची आत्महत्या

कुरखळी । KurKhali । वार्ताहर

- Advertisement -

शिरपूर-शिंदखेडा रस्त्यावरील (Shirpur-Shindkheda road) गिधाडे गावालगत (Gidhade village)असलेल्या तापी नदी पुलावरुन (Tapi River Bridge) उडी घेत (taking a jump) तरूणाने आत्महत्या (Youth committed suicide) केल्याची खळबळजनक घटना काल सायंकाळी घडली. हा तरूण नदी बुडत असल्याचा व्हीडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.

खरंच, आम्ही जळगाव जिल्हावासीय इतके ना-लायक आहोत?थंडीचा कडाका; शेकोटी भोवती रंगताहेत राजकारणातील चढाओढीच्या चर्चा

सुरेंद्र सरदारसिंग राजपूत (वय 24 रा. टेंभे बु. ता. धुळे) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो कृषी कंपनीत मार्केटिंगचे काम करत होता.तो काल दि.21 रोजी सायंकाळी मोटर सायकलीने गिधाडे गावाजवळील तापी पुलावर आला. पुलावर मोटरसायकल उभी करुन त्याने थेट तापी नदीत उडी घेतली. तेव्हा पुलावरुन जाणार्‍या एकाला तरूण उडी घेतांना दिसताच त्याने आरडाओरड केली. त्यामुळे नागरिक धावून आले. यादरम्यान तो पाण्यात बुडत असतांनाचा व्हिडीओ यावेळी एकाने काढला. तो सोशल मिडीयावरही व्हायरल झाला.

धुळ्यात गुरुवारी ग्रंथोत्सवअवघ्या 24 तासात अपहृत तरुणाचा शोधVISUAL STORY : हा विवाहित व्यावसायिक विश्वसुंदरी मानुषी छिल्लरला करतोय डेटVISUAL STORY: होय….मी घटस्फोटासाठी अर्ज दिलाय…..डीपीडीसीच्या सभेत… आ.खडसेंचा ‘अभिमन्यू’

मोटार सायकलवरुन तरुणाची ओळख पटल्यानंतर घटनास्थळी टेंभे येथील ग्रामस्थांनी दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत तरूणाचा तापी नदीत शोध घेण्यात आला.

परंतू तो मिळून आला नाही. आज पुन्हा सकाळपासून शोध सुरू केला असता आठ वाजेच्या सुमारास तरूणाचा मृतदेह पाण्यात मिळुन आला. सुरेंद्र याचा मृतदेह शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

मंत्री गिरीश महाजनांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मान्सून

Monsoon Update: आनंद वार्ता! मान्सून अरबी समुद्रात दाखल, केरळमध्ये १ जून...

0
पुणे | Pune उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून आज अरबी समुद्रात दाखल झाला आहे....