धुळे – प्रतिनिधी dhule
साक्री (sakri) तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालय सुरक्षा विभागातील (Ministry of Security Department) मुंबई पोलिसाने (Mumbai Police) साक्री तालुक्यातील आपल्या मुळ गावी गळफास घेत आत्महत्या (suicide) केली.
याबाबत पिंपळनेर पोलिसात (police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काळुराम चैत्राम अहिरे (वय 57 रा.मुळ कुडाशी पैकी पोहबारा ता.साक्री व ह.मु विशालनगरी अपार्टमेंट, विजय नगर, कल्याण जि. ठाणे) असे मयत पोलिस कर्मचार्याचे नाव आहे.
मुंबईतील मंत्रालय सुरक्षा विभागात त्यांची नियुक्ती होती. नुकतेच ते मुळ गावी आलेले होते. काल त्यांनी आज मी मुंबईला जाणार असल्याचे भावाला सांगितले होते. त्यानंतर सकाळी भाऊ कुटुंबासह शेतात कांदा रोप लावणीला निघून गेले. सायंकाळी सहा वाजता काम आटोपून घरी आला. त्यानंतर बैलांना चारापाणी करण्यासाठी राहत्या घराच्या बाजुला असलेल्या बैलाच्या गोठ्यात गेला. तेव्हा गोठ्यात लाकडी दांडयाला काळुराम अहिरे हा दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे घाबरून भावाने आरडाओरड करीत ग्रामस्थांना बोलविले.
खाली उतरवून ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत अहिरे यांना मृत घोषित केले. याबाबत पिंपळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोहेकाँ सोनवणे करीत आहे. दरम्यान सेवानिवृत्तीला आलेल्या अहिरे यांनी एवढे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण समजू शकलेले नाही.