धुळे । Dhule
साक्री तालुक्यातील छडवेल येथे छात्रालयात नववीत शिकणार्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत रात्री उशिरा पर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती.
छडवेल ला महात्मा ज्योतिबा फुले छत्रालयाच्या रूम नंबर 9 मध्ये दुपारी ही घटना घडली. साहिद दिलीप पाडवी (15 ) असे या दुर्दैवी विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो साकळी उमर तालुका अक्कलकुवा येथील रहिवासी आहे. छडवेल च्या नूतन मराठा विद्यालयात तो शिक्षण घेत होता. बाजूलाच असलेल्या छत्रालयात हे विद्यार्थी राहतात.
आज दुपारी जेवणाची ताटे घेण्यासाठी काही विद्यार्थी गेले असता त्यांना रूम नंबर नऊचा दरवाजा बंद दिसला त्यांनी दरवाजा वाजवून प्रयत्न केलेत पण नंतर खिडकीतून बघितले असता त्यांना बाजूच्या रूम मधील रहिवाशी साहिद लटकलेल्या स्वरूपात आढळून आला. त्यांनी लगेच ही माहिती कार्यलयीन अधीक्षकांना सांगितली. सायंकाळी त्याला जैताने ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ गावित यांज त्यास मृत घोषित केले.
नववीत शिकणार्या साहिद ने नेमकी आत्महत्या का केली याचे अद्याप कारण समजू सजकलेले नाही.रात्ती उशिरापर्यंत निजामपूर पोलिसात याबाबत नोंदी झालेली नव्हती.