Friday, March 28, 2025
Homeमनोरंजन'सास भी कभी बहु थी' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या

‘सास भी कभी बहु थी’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या

मुंबई | Mumbai

सुशांत सिंग राजपूत, मराठी अभिनेता आशुतोष भाकरे नंतर ‘सास भी कभी बहु थी’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘कहानी घर घर की’ यांसारख्या लोकप्रिय मालिकेत देखील काम केलेल्या समीर शर्मा या अभिनेत्याने आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह राहात असलेल्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

समीर शर्मा दिल्ली येथील रहिवासी होते. त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते बंगळूर येथे गेले. तिथे त्यांनी विविध प्रकारची कामे केली. पण आपले अभिनयाचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. स्टार वनच्या ‘दिल क्या चाहता है’ या मालिकेतून त्यांनी अभिनयाला सुरूवात केली होती. हिंदी चित्रपट ‘हसी तो फसी’ या चित्रपटात देखील त्यांनी काम केले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : बुवासिंदबाबा देवस्थान येथे महाआरती

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी शहरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले श्री बुवासिंद बाबा देवस्थानमध्ये काल दि. 27 मार्च रोजी सायंकाळी श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग...