Monday, May 27, 2024
Homeनगर...हे तर सेनेच्या उद्योमंत्र्यांचे उद्योग : खा. डॉ. विखे

…हे तर सेनेच्या उद्योमंत्र्यांचे उद्योग : खा. डॉ. विखे

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)

मागील अडीच वर्षे शिवसेनेचे उद्योगमंत्री होते. त्यांनी काय काय उद्योग केले हे सर्वांना माहिती आहे. कोणताही प्रकल्प एक महिन्यात पळून जात नसतो. एका महिन्यात मोठ्या कंपन्या दुसर्‍या राज्यात गेल्या. महाआघाडीचे मंत्री भ्रष्टाचारी असून ते जेलमध्ये गेले. ते लपविण्यासाठी आघाडीचे नेते असले आरोप करीत आहेत.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर विखे यांनी टीका केली. कोणताही अट्टाहास करून कामे होत नसतात.वडील मुख्यमंत्री असताना ते मंत्री झाले तेव्हा काय झाले. आता आरोप करणे सोपे आहे. केवळ टीका करणे हे विरोधकांचे काम नसते. त्यांनी सत्तेत असताना काय दिवे लावले ते सांगावे, असा टोला खा. विखे यांनी येथे लगावला.

दिवाळी निमित्ताने आमदार मोनिका राजळे यांनी वृध्देश्‍वर कारखाना येथील दादापाटील राजळे महाविद्यालयात दिवाळ फराळासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खा. विखे बोलत होते. त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून खासदार डॉ.सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पाथर्डी शेवगाव तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकार्‍यांसह सरपंच, चेअरमन व सदस्यांची मांदीयाळी होती.

यावेळी माजी जि.प.सदस्य राहुल राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ.मृत्युंजय गर्जे, पुरुषोत्तम आठरे,बाळासाहेब अकोलकर, अजय रक्ताटे, शेवगावचे ताराचंद लोंढे, बापुसाहेब पाटेकर, रिंकू फलके, गोकुळ दौंड, माणिक खेडकर, रशिदभाई तांबोळी, महादेव जायभाये, भगवान गर्जे, कैलास देवढे, रामनाथ देवढे, गहिनीनाथ काटे, दत्तात्रय मराठे, मंगल कोकाटे, अर्चना फासे, साखरबाई आठरे, सुनीता बुचकुल, राहुल गवळी, एकनाथ आटकर, काशिनाथ पाटील लवांडे, अ‍ॅड.प्रतिक खेडकर, बबनराव बुचकुल, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, रामकिसन काकडे, श्रीकांत मिसाळ, भगवान साठे, काकासाहेब शिंदे, विष्णूपंत अकोलकर, संजय मरकड, धनंजय बडे, संजय बडे, अमोल गर्जे, सुनील ओव्हळ, समीर पठाण, शिवाजी मोहिते, मुकुंद गर्जे, गंगाधर गर्जे, अ‍ॅड.संपत गर्जे, उद्धव माने, नवनाथ धायतडक, नारायण पालवे, बाबासाहेब गर्जे, राजेंद्र साप्ते, जे.बी. वांढेकर, शुभम गाडे, हर्षद गर्जे,संतोष शिंदे, गणेश चितळकर गणेश कराड,आर.जे. महाजन, जे.आर.पवार, संभाजी राजळे, विनायक म्हस्के, भास्करराव गोरे, रामेश्‍वर राजळे, ललित खेडकर, सोमनाथ अकोलकर, संदीप पवार, यांच्यासह मतदारसंघातील सरपंच, उपसरंपच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे अध्यक्ष, संचालक तसेच शेवगाव व पाथर्डी तालुक्याच्या ग्रामिण भागातून प्रत्येक गावातून कार्यकर्ते आले होते. केवळ फराळ करण्यासाठी दोन्ही तालुक्यातून एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या