Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशSukhbir Singh Badal: मोठी बातमी! शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल...

Sukhbir Singh Badal: मोठी बातमी! शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न Video

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. सुवर्ण मंदिराबाहेर हाणामारी झाली, त्याचवेळी सुखबीर सिंह बादल यांना गोळी मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मात्र या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. सुवर्ण मंदिराच्या गेटवर एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला रोखले व त्याला ताब्यात घेतले. नारायण सिंह असे आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -
मोठी बातमी! शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न

सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यासाठी ते सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसले होते. यावेळी अचानक एक व्यक्ती आला व त्याने सुखबीर सिंग बादल यांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिथे उपस्थित लोकांनी त्याला पकडले. आरोपी खालसाशी संबंधित असल्याचा संशय आहे.

अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल द्वारपाल म्हणून सेवा करत होते, त्याचवेळी गोळीबार करण्यात आला.तेवढ्यात समोरून हल्लेखोर आला आणि त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. सुखबीर सिंह बादलच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सैनिकाने हल्लेखोराला थांबवले आणि गोळी झाडली. मात्र, ही गोळी कोणालाही लागली नाही.

२०१५ मध्ये तत्कालीन अकाली सरकारच्या काळात सरकारकडून झालेल्या चुकांची कबुली दिल्यानंतर अखाल तख्तने सोमवारी बादल यांच्यासह तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील शौचालय साफ करणे, लंगरमध्ये सेवा देणे आणि भांडी धुण्याची शिक्षा सुनावली होती. त्याच शिक्षेचा भाग म्हणून बादल हे सुवर्ण मंदिरात प्रवेशद्वारावर सेवा देत होते. त्यावेळी ही घटना घडली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...