Monday, June 24, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : निफाड तालुक्यात सुखोई विमान कोसळले

Nashik News : निफाड तालुक्यात सुखोई विमान कोसळले

नाशिक | Nashik

- Advertisement -

एकीकडे राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल जाहीर होत असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील निफाड तालुक्यात (Nipahd Taluka) शिरसगाव येथे सुखोई विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील शिरसगाव, कोकणगाव शिवारात हे विमान कोसळले (Plane Crashed) आहे. या दुर्घटनेत दोन पायलट जखमी झाले असून दोन्ही वैमानिक थोडक्यात बचावले आहेत. तर ज्या शेतकऱ्याच्या शेतात हे विमान कोसळले त्या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, शिरसगाव येथे लढावू विमान कोसळल्याची माहिती मिळताच निफाडचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनी तत्काळ घटनास्थळी भेट जाऊन पाहणी केली. तसेच वैमानिकांची विचारपूस केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या