Thursday, March 13, 2025
HomeनाशिकSULA FEST 2025 : संगीत महोत्सवात उत्साह; आनंदाचा महापूर

SULA FEST 2025 : संगीत महोत्सवात उत्साह; आनंदाचा महापूर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आशियातील अग्रगण्य संगीत महोत्सव ‘सुलाफेस्ट’ने सर्वोत्तम कलाकार आणि रसिकांना एकत्र आणले आणि पहिल्या दिवशी चांगलाच संगीताचा धमाका झाला. या संगीत महोत्सवात देशातील सर्वोत्तम कलाकारांनी आपल्या धमाकेदार सादरीकरणांनी उपस्थितांना थक्क करून टाकले. येथील वातावरण जणू विद्युत प्रवाहाने भारलेले होते. रसिक नाचत-गात, प्रत्येक कलाकाराच्या सादरीकरणाचा आनंद घेत होते. लाइव्ह संगीतासोबत द्राक्षांचे स्टॉम्पिंग देखील सर्व प्रेक्षकांनी भरपूर आनंदाने केले.

- Advertisement -

सुलाफेस्टच्या पहिल्या दिवशी जवळपास ५००० हुन जास्त रसिकांनी भेट दिली. या संगीत महोत्सवात विविध प्रकारच्या संगीताचे अद्भुत मिश्रण पाहायला मिळाले. कालीकर्मा (डाउन टेम्पो इलेक्ट्रॉनिका), पिंक मॉस (आर&बी/निओ सोल), परवाज (प्रोग्रेसिव्ह रॉक), व्हेन चाय मेट टोस्ट (इंडी फोक), ड्युअलिस्ट इन्क्वायरी (लाइव्ह इलेक्ट्रॉनिका) आणि डिवाइन (हिप-हॉप/रॅप) या सारख्या प्रसिद्ध कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणांनी वातावरण अक्षरशः ढवळून टाकले आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व रसिकांनी कलाकारांच्या तालावर ताल धरला आणि संगीता सोबत आपल्या आवड वेगवेगळ्या विशेष अ‍ॅक्टिव्हिटीजचे सादरीकरण आणि आपल्या आवडत्या वाईनचा आनंद लुटला. सुलाफेस्टचा पहिला दिवस खरोखरच यशस्वी ठरला. संगीत, वाइन आणि आनंदाचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी उद्याचा दिवसही असाच उत्साहवर्धक ठरणार अशी अपेक्षा आहे.

सुलाफेस्टच्या पहिल्या दिवसाबाबत बोलताना, सुला विनयार्ड्सचे सीईओ राजीव सामंत म्हणाले, सुलाफेस्ट २०२५ हा संगीत, वाइन आणि आनंदाचा एक अविस्मरणीय अनुभव आहे. सुलाफेस्टची एक अशी खासियत राहिली की, या संगीत महोत्सवाने तरुणाई आणि रसिकांना सर्वांना एकत्र आणले, संगीताच्या माध्यमातून नवे अनुभव दिले आणि अत्यंत जोशपूर्ण वातावरण निर्माण केले आहे . हा अविस्मरणीय अनुभव रसिकांना देताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. आम्ही कलाकार आणि रसिकांचा उत्साह पाहून खूप खूश आहोत. धमाकेदार सादरीकरण आणि रसिकांचा अद्वितीय उत्साहामुळे सुलाफेस्टचा पहिला दिवस खरोखरच यशस्वी ठरला असे मला वाटते. संगीत, वाइन आणि आनंदाचा अद्भुत संगम अनुभवण्यासाठी उद्याचा दिवसही असाच उत्साहवर्धक ठरेल ही आम्हाला अपेक्षा आहे. पुन्हा लवकरच आम्ही आणखी भव्य सुलाफेस्ट आयोजित करण्याचे नियोजन करत आहोत.

हिरवीगार विनयार्डस, उजळलेले तारांकित आकाश, अविश्वसनीय लाईव्ह सादरीकरण आणि सोबत भारतातील उत्कृष्ट वाईनची होणारी अंतहीन उधळण या सर्व आकर्षक घडामोडींसह या महोत्सवाला भेट देणाऱ्यांसाठी तसेच त्यांना अवर्णनीय अनुभव देण्यासाठी सुलाफेस्ट २०२५ मध्ये विविध ब्रॅण्ड्ससोबत असलेली भागीदारी, त्यांची या महोत्सवात असलेली उपस्थिती यामुळे या महोत्सवाला एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे. तसेच येथे वेगवेगळ्या विशेष अ‍ॅक्टिव्हिटीजचे सादरीकरण, सर्वोत्तम पाककलेचे चविष्ट अनुभव देणारे विविध फूडस्टॉल्स आणि सुलाफेस्ट बझार तर आपणास एक विलक्षण मोहिनी घालून जातो. आशियातील अग्रगण्य सुलाफेस्ट महोत्सव नाशिक शहरासाठी आणि नाशिकाकरांसाठी ही एक खास ओळख बनली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...