Monday, November 25, 2024
Homeमनोरंजनअभिनेता सुमीत राघवन 'त्या' ट्विटमुळे होतोय ट्रोल

अभिनेता सुमीत राघवन ‘त्या’ ट्विटमुळे होतोय ट्रोल

मुंबई | Mumbai

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सुमीत राघवनला (Summet Raghavan) ओळखले जाते. तो सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतो.

- Advertisement -

सुमीत राघवने गोरेगाव येथील आरे कारशेडला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. त्याने आरे कारशेडला विरोध करणाऱ्यांवर अनेकदा टीका केली आहे. अशात त्याने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ज्यामुळे सुमीत राघवनला चांगलंच ट्रोल केलं जातं आहे.

सुमित राघवनने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हिडीओ फ्रान्समधील आहे. या व्हिडीओत रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना थेट रस्त्यावर ओढत लोळवत नेत बाजूला केलं जात आहे. तरी सुमित राघवनने हा व्हिडीओ शेअर करत म्हणाला आहे की आरे आंदोलकांसोबत पण हेच व्हायला हवं. डोक्यावर बसले आहेत हे बोगस फालतु लोक.

सुमीतच्या ट्वीटनंतर अनेक नेटकऱ्यांसह पर्यावरणप्रेमींनी त्याच्यावर टीका केली आहे. ‘तू नट म्हणून भिकारडा आहेसच, पण तू माणूस म्हणून पण नीच आहेस, पर्यावरण हा विषय तुमच्या समजुतीच्या बाहेरचा आहे, आंदोलकांना मारहाण केली पाहिजे हा तुमचा विचार अत्यंत चुकीचा आहे, रंगमंचावर आणि पडद्यावर काम करण्यासाठी डोक्याचा काही वापर नसतो, तुम्हाला सगळे दुसऱ्याने दिलेलेच बोलायचे असते. त्यात स्वतःच्या बुद्धीचा वापर कमी असतो. (काही अपवाद जरूर आहेत) अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या