पाणीटंचाईची तीव्रता भीषण
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
एप्रिल महिन्याच्या शेवटीच जिल्ह्यात दोनशेहून अधिक टँकरद्वारे (Tanker) पाणीपुरवठा होत असून 4 लाख 73 हजार 483 लोकांची तहान या टँकरच्या पाण्याद्वारे भागविण्यात येत आहे. जिल्ह्यात 227 गावे व 1 हजार 252 वाड्या वस्त्यांना 237 टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply) केला जात आहे. आता मे महिना सुरू होणार असून, या महिन्यात उन्हाची तीव्रता (Summer Intensity) आणखी वाढणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा टँकरची संख्याही वाढणार आहे.
पाणीटंचाई तीव्रता (Water Shortage) आता भीषण होत असल्याचे वास्तव आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असताना भरउन्हात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव कोरडे पडून लागल्याने टँकरच्या मागणीतही वाढ होत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे काम आणि दुसरीकडे भीषण दुष्काळ (Drought Severe) या दोन्ही पातळीवर प्रशासनला काम करताना दमछाक होत आहे.
जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात टँकरच्या मागणीला सुरुवात झाली. मात्र, निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास फेब्रुवारी महिना उजाडला. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात 237 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाथर्डी तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता अधिक असून निम्म्याहून अधिक तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या या तालुक्यात 78 गावे 404 वाड्यांना 87 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. म्हणजे तब्बल 1 लाख 60 हजार 515 लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून तालुक्यातील निम्म्याहून अधिक लोकांची टँकरने तहान भागविण्यात येत आहे. जिल्ह्यात राहाता, राहुरी, कोपरगाव (Kopargav), श्रीरामपूर (Shrirampur) हे चार तालुके वगळता उर्वरित 10 तालुक्यामध्ये टँकर (Tanker) सुरू झाले आहेत. सध्या पाथर्डी (Pathardi), कर्जत, पारनेर, श्रीगोंदा व शेवगाव (Shevgav) या पाच नगरपालिका हद्दीतही 20 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.