Tuesday, March 25, 2025
Homeनगरयंदा उन्हाळ्यात अभ्यासाला सुट्टी नाही

यंदा उन्हाळ्यात अभ्यासाला सुट्टी नाही

शिक्षकांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन वर्गाची सक्ती

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे. तसेच दर आठवड्यातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करून 30 जूनपूर्वी प्रत्येक विद्यार्थी भाषा आणि संख्याशास्त्र ज्ञानात परिपूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा राज्यातील दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यंदा सुट्टीतही शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्यापन करावे लागणार आहे.

- Advertisement -

या उपक्रमातील राज्यातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के भाषा आणि अध्ययन क्षमता परिपूर्ण करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व अनुदानित, खाजगी प्राथमिक, अनुदानित अंशतः अनुदानित या शाळांमध्ये हा उपक्रम सक्तीचा करण्यात आला असून सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी ऐच्छिक ठेवण्यात आलेला आहे. हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात 5 मार्च ते 30 जून या चार महिन्यांच्या कालावधीत राबवण्यात येणार असून यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमध्ये अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. यामुळे यंदा उन्हाळ्यातही शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे द्यावे लागणार असून अभ्यासाला सुट्टी मिळणार नाही. हा उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांना सुट्टीच्या कालावधीत ऑफलाईन अथवा ऑनलाईन अध्यापन करावे लागणार आहे.

निपुण भारत उपक्रमात प्रगत होणार्‍या विद्यार्थ्यांची क्षमता व प्रगती तपासण्यासाठी चावडी वाचन व गणन कार्यक्रम करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभाग पातळीवरून देण्यात आलेले आहेत. हा कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी अचानक जिल्हाभरातील सर्व शाळांना भेटी देत, या उपक्रमाच्या तयारीची माहिती तपासली. तसेच पुढील काळात सातात्यानेही तपासणी जिल्हा परिषद पातळीवरून करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

निपुण भारत उपक्रमात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने दिलेल्या विहित कालावधीत अपेक्षित अध्ययन स्तर गाठणार्‍या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळा अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. उपक्रमात संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीलाही सहभागी करून घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहेत.

उपक्रमाची वैशिष्ट्ये
या उपक्रमात मार्च महिन्यापासून विशेष तपासणीला सुरवात करण्यात आली आहे. दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांचा समावेश. दर आठवड्याला विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची प्रगती तपासणे बंधनकारक. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा तपासणी अहवाल सादर होणार. 100 टक्के अध्ययन क्षमता विकसित होणे गरजेचे. भाषा ज्ञान व संख्याज्ञानाची आठवड्याला परीक्षा. उन्हाळी सुटीतील मोहिमेचा 30 जूनला अंतिम मुदत. शिक्षकांनी सुटीतही मोहीम पूर्ण करणे गरजेचे. अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगतीच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न. अप्रगत विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलणे बंद. अभ्यासाची तयारी करूनच नव्या वर्षात प्रवेश करावा लागणार आहे.

‘असर’ घालवायचा
काही महिन्यांपूर्वी सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत असर या संस्थेच्या वतीने अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. या अहवालात सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. असर या संस्थेच्या अहवालाला शह देण्यासाठी राज्य पातळीवरून शालेय शिक्षण विभागाने निपुण भारत कार्यक्रमात सरकारी, तसेच अनुदानीत शाळामधील दुसरी ते पाचवी शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यास निर्णय घेतला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...