Monday, November 18, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्ह्यात आजपासून ‘सुंदर माझा दवाखाना अभियान’

नंदुरबार जिल्ह्यात आजपासून ‘सुंदर माझा दवाखाना अभियान’

नंदुरबार ।nandurbar प्रतिनिधी

जागतिक आरोग्य दिनाच्या (World Health Day) निमित्ताने उद्या दि.7 एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत (health institution) सुंदर माझा दवाखाना (Beautiful my clinic) अभियान (campaign) राबविण्यात येणार आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात हे अभियान दिनांक 7 एप्रिल 2023 ते 14 एप्रिल 2023 या कालावधीत सर्व आरोग्य केंद्रात राबविण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य समिती सुहास नाईक यांनी जिल्ह्यात उपक्रम प्रभाविपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहे.

या अभियानाचे उद्घाटन उद्या दि.7 एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र लहान शहादा ता.नंदुरबार येथे होणार आहे. या अभियान कालावधीत सर्व आरोग्य संस्थेत विविध उपक्रम राबवण्यात येणार असून अभियानाची सांगता दि.14 एप्रिल 2023 रोजी जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर घेऊन होणार आहे. शिबिरात आरोग्य तपासणी, औषधोपचार, आरोग्य शिक्षण व आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा देण्यात येणार आहे.

अभियान कालावधीत निरंतर गुणवत्तापूर्वक आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सुंदर माझा दवाखाना ही संकल्पना सर्व आरोग्य संस्थेत आरोग्य उपकेंद्रस्तरापर्यंत राबविण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रात रुग्ण उपचारासाठी आल्यावर त्यास आरोग्य संस्थेत प्रसन्न वातावरण अनुभवता यावे यासाठी सर्व आरोग्य संस्था स्वच्छ आणि सुंदर दिसाव्यात यासाठी आरोग्य संस्थेची आंतर्बाह्य स्वच्छता, परिसर स्वच्छता करण्यात येत असून संस्थेचे सुस्पष्ठ नावाचे फलक दर्शनी भागास लावणे तसेच आरोग्य सस्थेमार्फत देण्यात येणार्‍या सेवा दर्शनी भागात तसेच रूग्णांच्या बसण्याच्या जागेत फलक स्वरुपात लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वच्छतागृहे स्वच्छता व स्वच्छतागृहाची किरकोळ दुरूस्ती असल्यास करण्यात येणार आहे.

आरोग्य संस्थेच्या आवारात काही निर्लेखित करावयाचे साहित्य असल्यास त्याचे निर्लेखन या कालावधीत करण्यात येणार असून बगीचा असल्यास त्याला योग्य प्रकारे झाडांची कटींग करणे, कचरा अथवा पालापाचोळा इतरत्र दिसणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. ड्रेनेज संदर्भात काही प्रश्न असल्यास त्याबाबत नियमित व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य संस्थेतील प्रसिद्धी साहित्य योग्यरीतीने प्रदर्शित करण्यात येणार असून प्रत्येक महिन्यांच्या पहिला शनिवारी सर्व आरोग्य संस्थेत स्वच्छता दिवस पाळण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांनी शासकीय आरोग्य संस्थेत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती आरोग्य समिती सुहास नाईक यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या