राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. दरम्यान स्व.अजित पवार यांचे नंतर राज्याच्याचे उपमुख्यमंत्री पद रिक्त असून राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यासाठी होकार दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. यामुळे महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत.
उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत गटनेत्याची निवड केली जाणार असून, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी यासंदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनी पद स्वीकारण्यास होकार दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
उद्या होणाऱ्या आमदारांच्या बैठकीसाठी विधीमंडळाकडे जागेची मागणी करत पक्षाने पत्र पाठवलं आहे. अनेक आमदार सावधगिरी म्हणून आजच किंवा उद्या सकाळपर्यंत मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे.




