Sunday, May 19, 2024
Homeनगरअगस्ती कारखान्याच्या संचालकपदी सुनिताताई भांगरे बिनविरोध

अगस्ती कारखान्याच्या संचालकपदी सुनिताताई भांगरे बिनविरोध

अकोले | प्रतिनिधी

अगस्ती सहकारी साखर कारखाण्याचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या आकस्मित निधनामुळे रिक्त झालेल्या संचालक पदाच्या जागेवर त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई भांगरे यांची बिनविरोध निवड झाली. आता कारखान्याच्या उपाध्यक्ष पदी त्यांची निवड होणार की नाही याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शेतकरी समृद्धी मंडळाने सर्व 21 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळविला होता. या विजयात कै. अशोकराव भांगरे यांचा सिहाचा वाटा होता. त्यांच्यामुळे आदिवासी भागातून शेतकरी समृद्धी मंडळाला मोठे मताधिक्य मिळाले व या मंडळाला सर्व जागा जिंकता आल्या.

भीषण अपघात! भरधाव कार ट्रकला धडकली, तिघे जागीच ठार

स्वतः कै अशोकराव भांगरे अनुसूचीत जाती जमाती मतदार संघातून निवडून आले. नंतर त्यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली. उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जोमाने कामास सुरवात केली होती. कारखाना गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर कारखान्याच्या दैनंदिन कामाकडे लक्ष देता यावे म्हणून ते शेंडी सोडून अकोले येथे रहायला आले होते.

महिलांसाठी गुड न्यूज! आजपासून ST प्रवासात ५० टक्के सवलत

तालुक्याच्या आदिवासी भागात दोन लाख टन ऊस निर्मितीचे त्यांचे उद्दिष्ट होते. त्या प्रमाणे काम करण्यास त्यांनी सुरवात केली होती. मात्र नियतीच्या मनात वेगळेच काही होते. त्यांचे आकस्मित निधन झाले.

त्यांचे निधनाने रिक्त झालेल्या जागेवर संचालक मंडळ नवीन संचालकांची निवड करणार आहे. त्या साठी आज 17 मार्च रोजी संचालक मंडळाची विशेष सभा बोलविण्यात आली होती. त्यात श्रीमती सुनिताताई भांगरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. कै. भांगरे यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी भांगरे कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्यांच्या रिक्त जागी घेण्याची मागणी केली होती.

ट्रोलर्सचा सरन्यायाधीशांवर निशाणा; खासदारांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार

- Advertisment -

ताज्या बातम्या