Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसुनीता चारोस्करांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

सुनीता चारोस्करांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

दिंडोरी | Dindori

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar) ‘शिवस्वराज्य यात्रे’ निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत माजी आमदार रामदास चारोस्कर (Ramdas Charoskar) यांच्या सौभाग्यवती व माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर (Sunita Charoskar) यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Dindori News : विधानसभेला सक्षम उमेदवार देणार – जयंत पाटील

यावेळी त्यांनी आपल्या मनोगातात विधानसभेतील (Vidhansabha) स्थानिक प्रश्‍नांना हात घातला. विशेषत: वीज, रस्ते, आरोग्य, पाणी या मुभलूत सुविधांबरोबरच रोजगारांवर प्रश्‍न उपस्थित केला. यावेळी श्रीराम शेटे यांचा विशेष उल्लेख करत ते आपल्याला पिततुल्य असल्याचे सांगितले. त्याचबरोबर दत्तात्रय पाटील यांना देखील मार्गदर्शक म्हणून उल्लेख करत उपस्थितांची मने जिंकली.

हे देखील वाचा : दत्तक नाशिकची आश्वासन पूर्तता करण्यात महायुती अयशस्वी – जयंत पाटील

तसेच श्रीराम शेटे व दत्तात्रय पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताच उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवुन समर्थन केले. श्रीराम शेटे आणि दत्तात्रय पाटील यांच्या मार्गदर्शनातूनच आपण समाजकल्याण सभापती (Chairman) झालो आणि अवघ्या जिल्ह्यात आपण एक वैशिष्ट काम उभे करुन आपली एक वैशिष्ट ओळख निर्माण केले असून त्याचे शिल्पकार श्रीराम शेटे हे असल्याची देखील सुनीता चारोस्कर यांनी नमुद केले.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांची तारांबळ

प्रदेशाध्यक्षांकडून सुनीता चारोस्करांचे कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रे’निमित्ताने झालेल्या सभेत माजी समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी स्थानिक मुद्दांना हात घालत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी भाषण करतांना केलेली मुद्देसुद मांडणी ही लक्षवेधी ठरली. आपल्या मनोगतातून त्यांच्या भाषणाचे कौतुक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने उपस्थित समर्थकांनी टाळ्या वाजवून सुनीता चारोस्कर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या