Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याअखेर प्रतीक्षा संपली! सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळातून पृथ्वीवर परतले

अखेर प्रतीक्षा संपली! सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळातून पृथ्वीवर परतले

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

भारतीय वंशांच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर तब्बल नऊ महिन्यांनी पृथ्वीवर परत आले आहेत.५ जून २०२४ रोजी स्टारलायनरमधून आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनकडे झेपावले होते.तिथे ८ दिवस घालवल्यानंतर ते परतणार होते. मात्र त्यांच्या अंतराळयानामध्ये बिघाड झाला. त्यामुळे ते दोघेही तिथेच अडकून पडले होते. यानंतर नासाकडून सातत्याने त्यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर अनेक अडचणी पार केल्यानंतर आज म्हणजेच (दि.१९) रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३.३० वाजता फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले. दरम्यान नासाने अंतराळवीर जमीनीवर उतरले त्या क्षणाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

- Advertisement -

सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्पेसएक्स कॅप्सूल आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनहून निघाल्यानंतर काही तासांतच बुधवारी सकाळी गल्फ ऑफ मेक्सिको येथे उतरले. फ्लोरिडातील (Florida) तल्लाहसीच्या किनाऱ्याजवळ हे कॅप्सूल उतरले. जगभरातून अनेकांच्या नजरा या अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाकडे लागल्या होत्या. त्यानंतर अखेर ते पृथ्वीवर (Earth ) परतले. या लोकांना अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी १७ तास लागले. मात्र, त्यांच्या आरोग्याबाबत चिंता कायम आहे.

शरीरात झाले अनेक बदल

अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने त्यांच्या शरीरात अनेक बदल झाले आहेत. पृथ्वीवर परत आल्यानंतर आता त्यांना सामान्यपणे चालण्यास-फिरण्यास किती वेळ लागेल, हे सांगणे कठीण आहे. या अंतराळवीरांना वैद्यकीय पथकासाठी दोघांना सामान्य स्थितीत आणणे एक मोठे आव्हान असणार आहे. सध्या त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात काय केले?

अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) देखभाल आणि स्वच्छतेमध्ये आपली भूमिका बजावली. या स्टेशनला सतत देखभालीची आवश्यकता असते. असे म्हटले जाते की या स्टेशनचे क्षेत्रफळ जवळजवळ फुटबॉल मैदानाइतके आहे. सुनीता विल्यम्स यांनी जुन्या उपकरणांमध्येही बदल केले आणि काही प्रयोग केले. सुनीता विलियम्स यांनी स्पेस स्टेशनबाहेर तब्बल ६२ तास ९ मिनिटे घालवली अर्थात ९ वेळा स्पेसवॉक केले. सुनीता विलियम्स आणि त्यांच्या टीमने ९०० तास संशोधन केले. दरम्यान त्यांनी १५० हून अधिक प्रयोगही केले. सुनीता विल्यम्स यांनी अंतराळ स्थानकात अनेक महत्त्वपूर्ण अशा संशोधन प्रकल्पांमध्ये काम केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...