Tuesday, May 21, 2024
Homeनगरसुप्यातील पिण्याचे पाणी दुषित, मासे मृत्युमुखी

सुप्यातील पिण्याचे पाणी दुषित, मासे मृत्युमुखी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा गावासाठी गावालगत असलेल्या तलावामधून पाणी पुरवठा करण्यात येतो. परंतु या तलावाचे पाणी दुषित झाल्याने नागरीकनी हे पाणी न पिण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ग्रामपंचायतीने म्हटले आहे की, येथील जुनी एमआयडीसी मधील अँकार्ड ऑरगॅनिक कंपनी मधील पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता कंपनीच्या बाहेर सोडले गेल्याने हे दुषित पाणी गावच्या तलावात मिसळले गेल्याने पिण्याचे पाणीही दुषित झाले आहे.

- Advertisement -

या पाण्यात केमिकल असल्याने या तलावातील बहुतांश मासे मृत्युमुखी पडले आहेत. तसेच या परिसरातील शेतातील पिके जळून गेली आहेत. या कारणास्तव ग्रामस्थांनी तूर्तास पिण्याचे पाणी वापरू नये असे आवाहन सरपंच रोकडे यांनी केले आहे. या प्रश्नासाठी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून दुषित पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तूर्तास तरी पाणी पुरवठा दुषित असल्याने करता येणार नाही. अश्या प्रकारचे आवाहन लेखी पत्राद्वारे सुपा ग्रामपंचायत ने जाहीर केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या