Monday, July 1, 2024
Homeनगरसुपा शहरासह औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमणावर हातोडा

सुपा शहरासह औद्योगिक वसाहतीमधील अतिक्रमणावर हातोडा

माजी आ. लंके यांचे कार्यालयही जमिनदोस्त

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

पारनेर तालुक्यातील सुपा शहरासह, औद्योगिक वसाहत व नगर-पुणे महामार्गावर सुपा टोलनाका भागातील अतिक्रमणे शनिवारी जमीनदोस्त करण्यात आली. यात माजी आ. नीलेश लंके यांच्या कार्यालयाचा समावेश आहे. मागील शनिवारी (दि. 25) रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसुल विभाग, औद्योगिक वसाहत अधिकारी व पोलिस प्रशासन यांनी संयुक्त कारवाई करत सुपा येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रणे काढली होती. यात 150 अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा काल शनिवार (दि. 1) रोजी पुन्हा अतिक्रमण पथकाने सुपा येथे दस्तक देत परिसरातील उर्वरित अतिक्रमणांवर हतोडा चालवला.

यात सुपा एमआयडीसी परिसरात असलेले माजी आ. नीलेश लंके यांच्या कार्यालयावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. जेसीबीच्या सहाय्याने त्यांचे कार्यालय जमीनदोस्त केले. यावेळी अतिक्रमण पथकाने पारनेर रोडची अतिक्रमणे काढली. त्याचबरोबर सुपा टोलनाका परिसरातील अनेक अतिक्रमणे नष्ट केली. काल काढलेल्या अतिक्रमणात अनेक पक्क्या बांधकामाचा समावेश आहे. उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, डीवायएसपी संपत भोसले यांच्यासह अनेक बड्या अधिकार्‍यांच्या उपस्थित ही अतिक्रमणे काढण्यात आली. यावेळी सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरुण अव्हाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

अतिक्रमण काढत्या वेळी शिघ्र कृती दलाची तुकडी ही तैनात करण्यात आली होती. गेल्या आठ दिवसात सुपा शहरासह औद्योगिक वसाहत व महामार्गावरील अतिक्रमणे जमीनदोस्त केल्याने सुपा बसस्थानकासह सुपा-पारनेर रोड व नगर-पुणे महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसापासून सुपा परिसरातील अतिक्रमणे कळीचा मुद्दा ठरले होतो. या अतिक्रमणामुळे अपघात होऊन अनेकाचे प्राण गेले होते. तर अनेक वेळा या अतिक्रमणामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा त्रास नागरिकांना होतांना दिसत होता. यामुळे अनेक वर्षाच्या मागणीनंतर या भागातील अतिक्रमणे निघाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या