Friday, May 3, 2024
Homeनगरसुपा औद्योगिक वसाहतीत कंपनीत स्फोट होऊन भीषण आग

सुपा औद्योगिक वसाहतीत कंपनीत स्फोट होऊन भीषण आग

पारनेर । तालुका प्रतिनिधी

सुपा औद्योगिक वसाहतीतील सुपर इन्फो या कंपनीत स्पोट होऊन मोठी आग लागली. याआगीत सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी कंपनीचा कच्च्या माल जळून मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे .

- Advertisement -

याबात सविस्तर माहिती अशी की, सोमवारी दुपारी पाचच्या दरम्यान सुपा औद्योगिक वसाहतीतील खराब टायर पासुन आँईल बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली. यावेळी तेथे कामावर आसलेले दहा कामगार संगावधान पाहून पळाल्यामुळे सुदैवाने वाचले. स्फोटानंतर आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की धुराचे लोट दहा-वीस किमी पर्यत दिसत होते. संपूर्ण सुपा शहरावर प्रदूषणाचे काळे ढग जमा झाले होते.

गोल्डन ड्रेसमध्ये ‘हिना खान’चा जलवा, पाहा ग्लॅमरस फोटो

दरम्यान आग लागल्यावर कंपनी व्यवस्थापनने तेथुन पळ काढल्याचे प्रथम दर्शनीनी सांगितले.सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कामगार सुरक्षीत आहेत का याची खातर जमा केली. याबाबत सुपा पोलिस स्टेशनला उशीरापर्यत गुन्हा दाखल नव्हता .

सुपा औद्योगिक वसाहतीत वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असताना ऐवढ्या मोठ्या औद्योगिक वसाहतीत जेथे शेकडो कंपन्या असून हजारो कामगार काम करत आहेत तेथे एक ही आग्निशामक गाडी नाही यावर वारंवार संताप व्यक्त होत आहे. याबाबत काही कामगार आघाड्याच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बघा नजरेतून वाचता आलं तर…! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच

औद्योगिक वसाहतीत महामंडळाकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी कुठल्याच उपाययोजना राबल्या जात नाही. येथे आग्निशामक गाडीची वारंवार मागणी करुणही संबंधित याकडे दुर्लक्ष करत आहेत. आगीमुळे यापुर्वी येथे काहीनी प्राण गमवले आहे. तरीही एमआयडीसी प्रशासनाला जाग येत नाही. लवकर आग्निशामक गाडीची तरतुद करावी अन्यथा अंदोलन झेडले जाईल.

प्रताप शिंदे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा कामगार अघाडी)

- Advertisment -

ताज्या बातम्या