Friday, September 11, 2026
HomeनगरAccident News : सुपा-पारनेर रस्त्यावर काँक्रीट मिक्सर वाहनाची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा जागीच...

Accident News : सुपा-पारनेर रस्त्यावर काँक्रीट मिक्सर वाहनाची दुचाकीला धडक; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

सुपा-पारनेर मार्गावरील कन्हेर ओहोळ (Kanher Ohol) परिसरात सोमवारी (दि. 23 जून) सकाळी झालेल्या भीषण अपघातात (Accident) दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू (Husband and Wife Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पारनेर पोलिसांनी (Parner Police) काँक्रीट मिक्सर वाहन चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

सविस्तर माहिती अशी की, भिमराव गुंडू कांबळे आणि त्यांची पत्नी गौरी भिमराव कांबळे (सध्या रा. सुपा, ता. पारनेर, मूळ रा. उमगाव, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) हे दोघे त्यांच्या स्कुटी (एमएच 09 जीएन 5303) वरून सुपा (Supa) येथून पारनेरकडे जात असतांना कन्हेर ओहोळ परिसरात सकाळी सुमारे 11.50 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणार्‍या काँक्रीट मिक्सर (क्र. एमएच-16 सीडी-9150) वाहनाने धडक (Hit) दिली. यात दोघेही काँक्रीट मिक्सर वाहनाच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा या अपघातात (Accident) जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी विजय आलेसराव आरसुड (रा. सुपा) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात (Parner Police Station) फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे सुपा परिसरात शोककळा पसरली असून कांबळे दाम्पत्याच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. पारनेर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

रोहित

तुकाराम मुंढेना MPSC आयोगाच्या अध्यपदी नियुक्त करा, रोहित पवारांची मागणी

0
पुणे | प्रतिनिधीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगातील कथित गैरकारभार दूर करून पारदर्शकता आणायची असेल,तर विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांच्या जागी...