Sunday, November 15, 2026
Homeक्राईमParner : सुपा पोलिसांची 11 जणांच्या टोळीवर मोक्का कारवाई

Parner : सुपा पोलिसांची 11 जणांच्या टोळीवर मोक्का कारवाई

अहिल्यानगर-पुणे जिल्ह्यांत दरोडे, जबरी चोर्‍यांसह गंभीर गुन्ह्यांचा आरोप

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांत दरोडे, जबरी चोरीसह गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून सुपा पोलिसांनी 11 जणांच्या संघटित गुन्हेगारी टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्या मंजुरीनंतर गुन्ह्यात मोक्क्याची कलमे वाढविण्यात आली.

- Advertisement -

या प्रकरणातील आरोपी देवा उर्फ पावल्या कैलास काळे (वय 35, रा. कडूस, पाडळी रांजणगाव, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर; सध्या रा. सुंदर सृष्टी, शिरूर, जि. पुणे), रमेश सावत्या भोसले (वय 38, टोळीप्रमुख, रा. पिंपळगाव कौडा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर), तुषार सावत्या भोसले (रा. पिंपळगाव कौडा), अविनाश सावत्या भोसले (रा. पिंपळगाव कौडा), सुशांत सुरेश भोसले (रा. पिंपळगाव कौडा), अनिल सुरेश भोसले (रा. पिंपळगाव कौडा), आवेश निरप्या भोसले (रा. पिंपळगाव कौडा), लोंढया निरप्या भोसले (रा. पिंपळगाव कौडा), प्रशांत उर्फ प्रविण सुरेश भोसले (वय 27, रा. पिंपळगाव कौडा), राम उर्फ बोकड्या उर्फ बन्या लखण काळे (रा. पिंपळगाव कौडा) आणि शरद कैलास काळे (वय 42, रा. कडूस, पाडळी रांजणगाव, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या टोळीवर दरोडा, जबरी चोरी, हत्येचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणण्यासह विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने मोक्क्याची कलमे वाढविण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, अहिल्यानगर ग्रामीण विभाग, यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी वमने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि सुपा पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, कोठुळे, सहायक फौजदार विजय वेठेकर, पोलीस हवालदार अशोक मरकड, गोरे, माळवदे, पठारे, पोलीस नाईक बडे, मासाळकर, यशवंत ठोबरे, पोलीस कर्मचारी अमोल साळवे, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, शेळके, भांडवलकर, वंजारी, प्रशांत दिवटे, विकास गायकवाड, महिला पोलीस कर्मचारी शिंदे, सहायक फौजदार पांडे, पोलीस कर्मचारी निखिल मुरुमकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार तसेच पारनेर व नगर तालुका पोलीस ठाण्यांतील अधिकारी-अंमलदारांनी कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांच्या माहितीनुसार, 2026 मध्ये अहिल्यानगर ग्रामीण विभागांतर्गत पारनेर आणि सुपा पोलिसांनी दोन संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या

Narendra Modi : नक्षलवाद अन् माओवादाचे कंबरडे मोडले; PM मोदींची घोषणा,...

0
गडचिरोली | Gadchiroli क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा (Bhagwan Birsa Munda) यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त (१५ नोव्हेंबर) यंदाचा देशस्तरीय ‘जनजातीय गौरव दिन’ महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात...