Friday, May 31, 2024
Homeनगरकांदा भावासाठी सुप्यात रास्ता रोको आंदोलन

कांदा भावासाठी सुप्यात रास्ता रोको आंदोलन

पारनेर | तालुका प्रतिनिधी

कांद्याचे दर वाढवून मिळावे, निर्यात वाढीला चालना मिळावी, कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी सुपा बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

निळवंडे कालव्यांचे काम पुन्हा एकदा बंद, दुष्काळी भागात संताप

कांद्याचे बाजार कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आगदी माती मोल भावाने कांदा विकला जात असुन याबाबत आमदार निलेश लंके यांनी विधानसभेत भाव वाढीची जोरदार मागणी केली होती. यासंदर्भात शासनापर्यत आवाज जाण्याच्या उदेशाने हे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आमदार लंके यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. वाढते बि बियाने, खते, औषधाचे वाढते दर, मजूर मिळने अवघड झाले असताना अशा बिकट परिस्थितीत शेतकरी कांदा पिकवत असताना बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा खर्च ही निघत नाही. असे आमदार लंके म्हणाले .

रास्ता रोको दरम्यान राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, विजय पवार, अशोक सांवत, सतिष भालेकर आदी नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करत कांदा भाव वाढीची मागणी केली. यावेळी अनेक नेत्यानी कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या तर यावेळी मोठ्या प्रमाणात कांदा रस्तावर ओतुन शासनाचा निषेध केला. आंदोलनाला अर्जुन भालेकर, विजय औटी, दिपक लंके, सचिन पवार, किरण पवार, सचिन काळे, हरी पवार, राहुल झावरे, जितेश सरडे, संदीप चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते .

आंदोलनामुळे अहमदनगर पुणे महामार्गावर वाहानाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुरवातीला निवदन घेण्यासाठी तहसिलदार, प्रांत अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांनी यावे यासाठी आमदार लंके आडून बसले होते. नंतर प्रवासाची गैरसोय पाहून आमदार लंके यांनी शासनाचा व प्रसासनाचा निषेध करत आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला. यावेळी नायब तहसिलदार आढारी, पीआय ज्योती गडकरी, पी आय बळप यांनी निवेदन स्विकारले. यावेळी सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक ज्योती गडकरी पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निराक्षक घनश्याम बळप महामार्ग पोलिस निरिक्षक शशिंकात गिरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

- Advertisment -

ताज्या बातम्या