Thursday, May 1, 2025
Homeमनोरंजनसुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर; 'या' जवळच्या व्यक्तीचे निधन

सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे निधन

नवी दिल्ली | New Delhi

पूर्वीचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे (South Superstar Mahesh Babu) वडिल घटामनेनी शिव रामा कृष्ण मूर्ती उर्फ कृष्णा (Krushna) यांचे आज वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart Attack)निधन झाले आहे…

- Advertisement -

दोन महिन्यांपूर्वीच महेश बाबूच्या आई इंदिरा देवी (Indira Devi)यांचे निधन (Death)झाले होते. त्यानंतर आज वडिलांचे निधन झाले. त्यामुळे मनोरंजन सृष्टीवर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. सोमवारी (दि. १४) रोजी पहाटे कृष्णा यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना हैद्राबाद येथील कॉन्टिनेंटल रुग्णालयात (Continental Hospital)दाखल करण्यात आले होते. पंरतु आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या प्रियकराचा पोलिसांकडे धक्कादायक खुलासा

दरम्यान, कृष्णा यांनी १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला तेलुगू चित्रपटांतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. काही काळातच त्यांना एक अग्रगण्य व्यक्ती म्हणून मोठे यश मिळाले. १९८० च्या दशकात त्यांना चित्रपट उद्योगात सर्वोच्च स्थान कायम होते. ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५० हून अधिक चित्रपट केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्ह्यातील 44 गावांतील पिण्याचे पाणी दूषित

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उन्हाच्या तीव्रतेने जिल्ह्यात अनेक गावे व वाड्यावस्त्यांतून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागल्याने टँकरसह मिळेल त्या जलस्रोतावर नागरिकांना अवलंबून राहावं लागत आहे. परिणामी...