Friday, February 6, 2026
Homeजळगावआ.मंगेश चव्हाण यांना एकलव्य स्वाभिमान संघटनेची साथ

आ.मंगेश चव्हाण यांना एकलव्य स्वाभिमान संघटनेची साथ

चाळीसगाव । प्रतिनिधी

चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी यांना पाठिंबा देण्यासाठी आणि भाजपा पक्षप्रवेश करणाऱ्यांची अक्षरशः रीघ लागली असून आजदेखील एकलव्य स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अपक्ष उमेदवार दिनकर मोरे यांनी आपल्या संघटनेच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकासात्मक नेतृवावर विश्वास ठेवून जाहीर पाठिंबा दिला आहे.

- Advertisement -

एकलव्य स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिनकर मोरे यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाजबांधवांना आवाहन केले आहे, की चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांचा एकुणच विकास कामांचा झंझावात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता सर्वसमावेशक विविध सामाजिक व जाती धर्मासाठी त्यांनी केलेली विकासकामे पाहता त्यांना एकलव्य स्वाभिमान संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देत आहोत.

YouTube video player

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांच्या व्यतिरिक्त आमचा कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला किंवा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही याची नोंद घ्यावी. तरी एकलव्य स्वाभिमान संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव यांनी मंगेश रमेश चव्हाण यांना साथ द्यावी असे आवाहन दिनकर मोरे यांनी केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...