Friday, November 8, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकोचरगाव, उमराळे बु. गटात ना. झिरवाळांचा जोर

कोचरगाव, उमराळे बु. गटात ना. झिरवाळांचा जोर

ना. झिरवाळांसाठी मतदारांची जातीय राजकारणाला मूठमाती

- Advertisement -

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातील कोचरगाव व उमराळे बुद्रुक गटात यंदा जातीय समीकरणे बदलली असून जनता जातीय राजकारणापेक्षा विकासालाच प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे. ना. नरहरी झिरवाळ यांचे वेगवेगळ्या गावांमध्ये जोेरदार स्वागत होत असून लाडक्या बहिणींचा मुद्दा घड्याळाला प्रचंड यश मिळवून देईल, अशी चिन्हे आहेत. ‘हजारो लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाल्याने पुन्हा एकदा निवडून आणावा लागेल झिरवाळ होईल आपली हिरवळ’ अशी घोषणा लाडक्या बहिणी देत होत्या.

ना. नरहरी झिरवाळ यंदा घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढत असल्याने दिंडोरी-पेठ तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा घड्याळाला मतदान देण्याचा निर्धार व्यक्त केलेला दिसतो. घड्याळ म्हणजे प्रगती आणि घड्याळ म्हणजेच आपला विकास अशी धारणा जनतेची पूर्वीपासून झालेली आहे. म्हणूनच जनता ना. नरहरी झिरवाळ यांचे जागोजागी स्वागत करताना दिसत आहे. उमराळे बुद्रुक गटात आणि कोचरगाव गटात पूर्वी जातीयवाद पेरला जायचा. त्यामुळे जनता भूलथापांना बळी पडायची. मात्र मतदान करून कोणताही विकास या गटात विरोधकांनी केला नाही. कधी रस्त्यांचे प्रश्न सोडवले नाही की कधी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवले नाही.

या गटातील सर्वच प्रश्नांना ना. झिरवाळ यांनी न्याय दिला. उमराळे बुद्रकु गटातील आणि कोचरगाव गटातील अनेक रस्त्यांना ना. नरहरी झिरवाळ यांनी मंजुरी आणल्या. अगदी शेत शिवार रस्त्यांचेसुद्धा डांबरीकरण झाले. नद्या-नाल्यांवर पूल झाले. अनेक कामे आता प्रगतिपथावर आहेत. काही कामे निवडणुकांमुळे लांबली आहेत, पण त्यांना सुरुवात होणार असल्याचे ना. नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. ठक्कर बाप्पा योेजनेच्या माध्यमातूनही कामे केली. गावोगावी सभामंडपे दिली. त्यामुळे गोरगरिबांची लग्ने, वाढदिवस, दहावे, वर्षश्राद्ध इत्यादी कार्यक्रम कमी खर्चात होऊ लागले. पाण्याचे साठे उपलब्ध केले. शेतकर्‍यांना विविध योजना मिळवून दिल्या. विमा नुकसान मिळवून दिले. आदिवासी विकास विभागाचा तर प्रचंड निधी ना. नरहरी झिरवाळ यांनी उमराळे बुद्रुक आणि कोचरगाव गटात दिला. त्यामुळे जनता आणि गावोगावचे सरपंच झिरवाळ यांच्यावर प्रचंड खूश झालेले आहेत. त्यामुळे अनेक सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी ना. झिरवाळ यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला आहे.

ते सर्व आता या दौर्‍यामध्ये बोलून दाखवत होते. फक्त निवडणुका आल्या की यायचे. भेटीगाठी घ्यायच्या आणि आपले काम समाप्त झाले की परत जनतेकडे ढुंकूनही पाहायचे नाही अशी तर्‍हा विरोधकांनी या गटात मांडली होती. पण आता जनता हुशार झाली. त्यांना कळून चुकले की नरहरी झिरवाळ हे साधे आणि सरळ उत्तुंग व्यक्तिमत्त्व आहे. कुठेही कधीही सहज उपलब्ध होणारे, कोणत्याही जाती-धर्मात समरस होणारे आणि कुठेही सुखदु:खात सहभागी होणारा नेता आहे. विरोधक कधी कुणाच्या सुखदु:खात सहभागी झाले नाही. परंतु हे निवडणुका असो अथवा नसो कधींही कुणाच्याही सुखदु:खात झिरवाळ हे धावून येतात. त्यामुळे आपले मत हे झिरवाळांनाच द्यायचे असा निर्धारच उमराळे बुद्रुक आणि कोचरगाव गटातील जनतेने व्यक्त केला. ना. झिरवाळ हे कधीही उपलब्ध होतात. ना. नरहरी झिरवाळ यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. ना. झिरवाळ यांनी जनतेचे आभार मानले. या दौर्‍यात अनेक मान्यवर सहभागी झाले होेते. ना. झिरवाळ यांना कोचरगाव व उमराळे बु. गटात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने त्यांचा आजच विजय निश्चित मानला जातो.

‘साहेब, आमचे घड्याळालाच मतदान’; लाडक्या बहिणींचा सूर
कोचरगाव आणि उमराळे बु. गटात ‘लाडक्या बहिणी’ ना. नरहरी झिरवाळ यांना तारणार असल्याचे चित्र दिसून आले. लाडक्या बहिणींची यंदाची दिवाळी गोड झाली. महायुती सरकारने महिलांना दिवाळी सुरू होण्याअगोदरच खात्यावर पैसे टाकले होते. उमराळे बु., कोचरगाव गटात अनेक महिला लाभार्थी होत्या. या महिलांना या योजनेचा फायदा झाल्याने सर्वांनी ना. नरहरी झिरवाळ यांच्या घड्याळालाच मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘काही असो साहेब, आम्ही घड्याळालाच मतदान देणार’ असा सूर महिलांनी ना. झिरवाळ येथे प्रचारास आले असता लावला. महिलांचा हा प्रतिसाद पाहून ना. झिरवाळसुद्धा हेलावून गेले. विकासाबरोबर दिवाळीसुद्धा गोड झाल्याने ना. झिरवाळ यांचा विरोधकांपेक्षा प्रचंड मतांनी विजय होईल, असा आशीर्वाद महिलांनी दिला.

जातीयद्वेषाचे विष पेरल्याने विरोधकांचेच नुकसान
दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात सर्व लोक गुण्यागोविंदाने राहातात. त्यामुळे जातीयवादाचा प्रश्न येत नाही. राजकीय स्वार्थासाठी जातीयवादाचे विष पेरू नका अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा ना.नरहरी झिरवाळ यांनी दिला. उमराळे बुद्रुक आणि कोचरगाव गटातील काही गावांचा दौरा ना. नरहरी झिरवाळ यांनी केला. त्यावेळी विरोधकांना ना.नरहरी झिरवाळ यांनी इशारा वजा सल्लाही दिला आहे. ना.नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, पेसा भरतीचा फायदा सर्व समाजाला झाला. आदिवासी नावाखाली कोळी, कोकणा येतात. इतर काही समाज येतात. परंतु काही विरोधक स्वार्थासाठी गैरसमज पसरवत आहेत. मंत्रालयात समाजासाठी आम्ही आंदोलन केले तेव्हा विरोधक कुठे होते? पेसा कायद्याबाबत विरोधकांनी आमच्या समोरासमोर बसावे व प्रश्न विचारावे, जर त्यांना नाही विचारता आले तर आम्ही विचारतो, त्यांची उत्तरे विरोेधकांनी द्यावी नाहीतर आम्हीच देतो. उगीच वेगळे वळण लावून जातीय राजकारण करू नये. त्याचा तोटा विरोधकांनाच होईल हे लक्षात ठेवावे, असे ना.झिरवाळ यांनी सांगताच मतदारांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आम्हाला मागचा अनुभव दांडगा असून झिरवाळ यांची विद्वत्ता व पेसासाठी केलेल्या संघर्षाची जाणीव मतदार मतदानातून देतील, असे अनेक गावकर्‍यांनी झिरवाळ यांना सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या