Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली

मुंबई । Mumbai

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन (Curative Petition) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) स्वीकारली आहे. सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारली असल्याची माहिती मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील (Vinod Patil) यांनी केला आहे. क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारण्याची शक्यता ही खूप कमी असते पण आता सुप्रीम कोर्टाने पिटीशन स्वीकारल्याने हा एक मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भातील आशेचा एक किरण उगवला आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने स्वीकारली आहे. या क्युरेटिव्ह पिटीशनवर 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या संदर्भात मराठा आरक्षण आयिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले की, क्युरेटिव्ह पिटीशन 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुनावणीसाठी ठेवली आहे. याचा अर्थ असा होतो की, क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टाने नाकारली नसून स्वीकारली आहे. आम्हाला विश्वास आहे की, लवकरात लवकर यावर सुनावणी होऊन मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण मिळेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या