Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! नवाब मलिक यांना जामीन मंजूर

मोठी बातमी! नवाब मलिक यांना जामीन मंजूर

मुंंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( NCP Minister Nawab Malik ) यांना जामीन मंजूर (Supreme Court Grants Bail) करण्यात आलं आहे. तब्बल दीड वर्षांनी ते तुरुंगाबाहेर येणार आहेत. पण वैद्यकीय कारणास्तव २ महिन्यांसाठी हा जामीन असणार आहे. सक्तवसुली संचलनालयाने सर्वोच्च न्यायालयात जामिनीला विरोध केला नसल्याने मलिक यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे नवाब मलिक तब्बल १ वर्ष ५ महिन्यानंतर जेलबाहेर येणार आहेत.

- Advertisement -

प्रकृतीचे कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली. प्रकृतीच्या कारणास्तव पुढील २ महिन्यांसाठी मलिकांना जामीन मिळाला आहे.

नवाब मलिक मूत्रपिंडाच्या उपचारांसाठी कुर्ला येथील खासगी रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास विशेष न्यायालयाने नकार दिल्यानंतर मलिक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या याचिकेवर निर्णय देताना त्यांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना जामीन मंजूर केला आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात नवाब मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. लँड डीलशी संबंधित हे प्रकरण असून टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला होता.

महाविकास आघाड सत्तेत असतानाच मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करत होते. तसेच भाजपने देखील मलिक यांना अनेकदा देशद्रोही म्हटले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत गेल्यापासून मलिक यांच्या कारागृहातून बाहेर येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मलिक शरद पवार गटात जाणार की, अजित पवार हे अनिश्चित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या