Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशगंभीरच! सरन्यायाधीश बी आर गवईंवर खंडपीठात वकिलाकडून वस्तू फेकण्याचा प्रयत्न; सुनावणीवेळी घडली...

गंभीरच! सरन्यायाधीश बी आर गवईंवर खंडपीठात वकिलाकडून वस्तू फेकण्याचा प्रयत्न; सुनावणीवेळी घडली घटना

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
सर्वोच्च न्यायालातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना वकीलाने बी.आर. गवईंवर वस्तू फेकण्याचा प्रयत्न केला.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सुनावणीदरम्यान वकीलाने सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकल्याचे वृत्त दिलं आहे.तथापि, बूट त्यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचला नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली. त्यांना न्यायालयाच्या कक्षातून बाहेर काढले. या घटनेनंतर, न्यायालयीन कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते, परंतु नंतर ते सुरळीतपणे सुरू झाले.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?
सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू झाले होते. सुनावणीवेळी युक्तीवाद सुरू होता, त्यावेळी राकेश किशोर हा वकील पुढे आला अन् पायातील बूट काढून गवईंकडे फेकण्याचा प्रयत्न केला. वेळीच सुरक्षा रक्षाकाने त्याला ताब्यात घेतले. कार्टाच्या बाहेर काढले. कोर्टाबाहेर जाताना तो सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणा देत होता. हा सर्व प्रकार सुरू होता त्यावेळी CJI गवई शांत होते. ते म्हणाले की, अशा घटानामुळे आम्ही विचलीत होणार नाही. तुम्ही तुमचा युक्तीवाद सुरूच ठेवा.

YouTube video player

आरोपी वकिलाचे नाव राकेश किशोर आहे. तो 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये नोंदणीकृत होता. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या ७ फूट उंच शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश गवई यांच्या टिप्पण्यांमुळे वकील नाराज असल्याचे मानले जाते. 16 सप्टेंबर रोजी, सरन्यायाधीशांनी तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत म्हटले की, “जा आणि देवाला स्वतःहून ते करायला सांगा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता, म्हणून जा आणि त्यांची प्रार्थना करा.” हे एक पुरातत्व स्थळ आहे आणि ASI ला परवानगी देण्याची गरज आहे. माफ करा.”

सरन्यायाधीशांचे स्पष्टीकरण
भगवान विष्णूच्या मूर्तीच्या बदलीबाबतच्या त्यांच्या टिप्पण्यांवर सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की त्यांची टिप्पणी सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर केली गेली. ते म्हणाले की, मी सर्व धर्मांचा आदर करतो. न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन, जे खंडपीठाचा भाग होते, त्यांनी सोशल मीडियाला अँटी-सोशल मीडिया म्हटले. त्यांनी म्हटले की त्यांचेही चुकीचे सादरीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, याचिकाकर्त्याचे वकील संजय नुली यांनी सांगितले की, सरन्यायाधीशांबद्दल सोशल मीडियावर फिरणारे विधान खोटे आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...