Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNCP Supreme Court Hearing: ऐन निवडणुकीत सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश;...

NCP Supreme Court Hearing: ऐन निवडणुकीत सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश; ‘या’ कारणासाठी दिला ३६ तासांचा दिला अल्टिमेटम

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या असताना राजधानी नवी दिल्लीत शरद पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना ३६ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या ३६ तासांत अजित पवारांना पक्षचिन्हाबाबत खुलासा करणारी सूचना राज्यातील वर्तमानपत्रांत छापायचे आहे. तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहेत. आमच्याकडून जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे असा डिस्क्लेमर दिला जात आहे, असे अजित पवार गटाने सांगितले. परंतु शरद पवार गटाने त्यावर आक्षेप नोंदवला.

- Advertisement -

हे ही वाचा: Jammu Kashmir Article 370: जम्मू-काश्मीर विधानसभेत मोठा राडा; कलम ३७० चा ठराव प्रस्ताव पास, भाजप आमदारांचा विरोध

सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान डिस्क्लेमरबाबत विचारणा करण्यात आली. त्यानुसार, आमच्याकडून जाहिरातीच्या प्रत्येक ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे असा डिस्क्लेमर दिला जात आहे असे अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितले. तुम्ही प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाहिरातीमध्ये हा डिस्क्लेमर देत आहात का? अशी विचारणा कोर्टाने केली. त्यावर दररोज नाही मात्र गरजेच्या ठिकाणी आम्ही प्रकटीकरण देत आहोत, असे अजित पवार गटाने सांगितले. त्यावर पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये डिस्क्लेमर देणे अनिवार्य असेल, असे निर्देश न्यायालयाने दिले.

दरम्यान शरद पवार यांचे वकील प्रांजल अगरवाल यांनी अनेक ठिकाणी डिस्क्लेमर दिला नसल्याचा दावा केला. अजित पवारांच्या वकिलांकडून आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करतो आहे असा दावा करण्यात आला असता, शरद पवारांकडून पुरावे मिटवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अनेक ठिकाणी हे डिस्क्लेमर दिले नाही, त्याचे स्क्रीनशॉट आहेत, असेही आगरवाल यांनी सांगितले. त्यावर न्यायालयाने पुढच्या २४ ते ३६ तासांमध्ये डिस्क्लेमर देणे अनिवार्य असेल, असे निर्देश दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...