Monday, March 31, 2025
Homeमनोरंजन‘या’ चित्रपटावरील बंदी उठविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

‘या’ चित्रपटावरील बंदी उठविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुंबई – Mumbai

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट मोठ्या अडचणींचा सामना करत आहे.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाने बिग बींच्या ‘झुंड’ चित्रपटावर लावण्यात आलेली बंदी उठविण्यास नकार दिला असून तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशाविरूद्ध दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहेत. सध्या हा चित्रपट कॉपीराईटच्या वादाभोवती फिरत आहे. त्यामुळे तेलंगणा न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.

मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. मसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने हायकोर्टाच्या 19 ऑॅक्टोबरच्या आदेशाविरूद्ध सुपर कॅसेट इंडस्ट्रीज (टी मालिका) याचिका फेटाळून लावली आहे.

खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले की, ‘विशेष मान्यता याचिका फेटाळण्यात येत आहे. परिणामी, या प्रकरणातील प्रलंबित अर्ज, जर काही असतील तर त्या निकाली लावण्यात आल्या आहेत.’

खंडपीठाच्या या सुनावणीनंतर बिग बींच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गावर अडखळे येत आहेत. हैदराबादस्थित लघुपट निर्माता नंदी चिन्नी कुमार यांनी चित्रपट निर्मात्यांवर कॉपीराइट उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तर दुसर्‍या पक्षाने हे आरोप फेटाळले आहेत.

तर सुनावणी दरम्यान खंडपीठाने मनोरंजक प्रकरण असल्याची टिप्पणी करत पुढील सहा महिन्यामध्ये हे प्रकरण निकाली लावण्याचे आदेश दिले आहेत.

सांगायचं झालं तर ’झुंड’ चित्रपट स्लम सॉकर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक विजय बुर्से यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : “मी गुढी-बिढी काही…”; काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांचे विधान...

0
मुंबई | Mumbai राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून आणि स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) इतरांना उद्देशून गायलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे नवा वाद...