मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे चिन्हं हे घड्याळच राहणार आहे. सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना दिलासा दिला आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळा ऐवजी दुसरा चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या वतीने करण्यात आली होती. ही मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तूर्तास तरी अजित पवार गटाकडे घड्याळ चिन्ह राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट या याचिकेवर निर्णय होण्याच्या प्रतिक्षेत होते.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मागील काही महिन्यांपासून या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी झाली.