Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याठाकरे गटाला मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाने शिंदेंच्या पक्षाला दिले 'हे' आदेश

ठाकरे गटाला मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टाने शिंदेंच्या पक्षाला दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली | New Delhi

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर आता या प्रकरणावर पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे. तोपर्यंत ठाकरे गटाला देण्यात आलेले नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल चिन्ह कायम राहणार आहे.

- Advertisement -

… फिर भी हम शिवसेना में रहेंगे – राऊत

निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लगेच ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्णायावर ठाकरे गटाने (Thackeray Group) आक्षेप घेतला. सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने यावर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज यावर सुनवणी झाली.ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी तर शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने शिंदे आणि ठाकरे गटाला नोटीस पाठवली असून २ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

फडणवीसांना मी सुसंस्कृत समजत होतो, मात्र…; राऊतांचा टोला

तसेच सुप्रीम कोर्ट याप्रकरणाची पुढील सुनावणी घेत नाही, तोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आधारावर व्हीप काढला तर ठाकरे गटाला लागू होणार नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात (MLA) व्हीप काढणार नाही किंवा अपात्र करणार नाही, असे आश्वासन शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दिले आहे. तर एक आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी होणार असून ठाकरे गटावर कारवाई न करण्याचे आदेश शिंदे गटाला (Shinde Group) देण्यात आले आहे. पंरतु,निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

महापौर निवडणुकीत AAP ने मारली बाजी, ‘या’ आहे नव्या महापौर

- Advertisment -

ताज्या बातम्या