Tuesday, May 21, 2024
Homeदेश विदेशSupreme Court On Demonetisation : नोटबंदीचा निर्णय योग्यच! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Supreme Court On Demonetisation : नोटबंदीचा निर्णय योग्यच! सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

दिल्ली | Delhi

केंद्र सरकारनं (Central Government) २०१६ मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या (Demonetisation) निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) आज निकाल दिला. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय योग्यच होता, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती एस. ए. नझीर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांचे घटनापीठाने आज नोटाबंदीवर निकाल जाहीर केला आहे.

नवीन वर्ष, नवे नेते…! किरीट सोमय्यांचे जोरदार प्लॅनिंग, ‘या’ ५ नेत्यांची नावं केली जाहीर

नोटबंदी सरसकट अयोग्य ठरवली जाऊ शकत नाही, असं महत्त्वाचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या एकूण ५८ याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

प्रियकराचं प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य, लक्ष्य विचलीत करणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

- Advertisment -

ताज्या बातम्या