Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्रपरमबीर सिंह यांच्या 'त्या' याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

परमबीर सिंह यांच्या ‘त्या’ याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई | Mumbai

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात नाहीतर तर देशातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पत्राद्वारे सिंग यांनी अनिल देशमुखांवर पैसे वसुली करण्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या यायिकेवर आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. पण याबाबत कोणताही निर्णय न देता परमबीर सिंह यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जावं, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सुनवाणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केलं नाही? अशी विचारणा केली. तसंच यावेळी त्यांनी ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना CBI चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही? अशी विचारणा केली. परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाहीत अशी विचारणा केल्यानंतर मुकूल रोहतगी यांनी आजच उच्च न्यायालयात अर्ज करु अशी माहिती दिली.

परमबीर सिंह यांनी याचिकेत काय म्हटलं होत?

परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हंटल होत की, ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निप:क्ष, प्रभावहीन आणि कोणतीही बाजू न घेता चौकशी व्हावी. पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सतत्या तपासणे आवश्यक आहे.

अनिल देशमुखांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांच्या निवासस्थानी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत बैठक घेतली होती. या दोघांच्या वरिष्ठांना डावलून ही बैठक झाली होती. त्या बैठकीत महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेत अनिल देशमुखांनी दिलं होतं. त्यापूर्वी २४ की २५ ऑगस्ट २०२० मध्ये, रश्मी शुक्ला, ज्या राज्य गुप्तचर यंत्रणेच्या आयुक्त आहेत, त्यांनीही पोलीस महासंचालकांना, पोस्टिंग किंवा बदलीमध्ये अनिल देशमुखांकडून भ्रष्टाचार होत असल्याचं सांगितलं होतं.

मात्र त्यावेळी याप्रकरणात अनिल देशमुखांवर कोणतीही कारवाई न करता उलट रश्मी शुक्लांनाच सुनावण्यात आलं होतं. मग गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेक तपासामध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते,’ असा उल्लेख परमबीर सिंग यांनी आपल्या याचिकेत केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या