Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयSupriya Sule : "राज्यात महिलांसाठी सुरक्षित..."; स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंचा सरकारला...

Supriya Sule : “राज्यात महिलांसाठी सुरक्षित…”; स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल

पुणे | वृत्तसंस्था | Pune

येथील स्वारगेट बसस्थानकातील (Swargate Bus Stand) एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर (Young Woman) बुधवारी (दि.२६) रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास अत्याचार (Rape) झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचे नाव असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची (Police) आठ पथके रवाना झाली आहेत.

- Advertisement -

या घटनेनंतर राज्यातील महिला (Women) सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. अशातच आता बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील या घटनेवरून सरकारला जाब विचारला आहे. सुळे यांनी या प्रकरणावरून एक्स या माय्क्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की “स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शवणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

पुण्यात (Pune) दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली आहे याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अत्याचार घडलेल्या आगारामधील बंद पडलेल्या बसमध्ये ३० कंडोम्, ५ साड्या, ६ ब्लँकेट, १ चादर, ३ अंतर्वस्त्र आढळून आली आहेत. तसेच अत्याचारांची घटना घडल्याची माहिती झाल्यानंतर दुपारी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी आगारामधील सुरक्षा रक्षकांच्या कॅबिनची हातोडा, दगड, सळीने तोडफोड केली.

स्वारगेट बस स्थानकातील २३ सुरक्षा रक्षकांचे तात्काळ निलंबन

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत स्वारगेट स्थानकातील २३ सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन केले आहे. तसेच उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक कामावर रुजू करण्याचे परिवहन मंत्र्यांनी आदेश दिले आहेत. त्यासोबतच स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर परिवहन आयुक्तांकडे हा अहवाल सादर केल्यावर कारवाईचा निर्णय होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...