Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSupriya Sule: "एकीकडे नैतिकतेवर राजीनामा अन् दुसरीकडे वैद्यकीय कारण…"; मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया...

Supriya Sule: “एकीकडे नैतिकतेवर राजीनामा अन् दुसरीकडे वैद्यकीय कारण…”; मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळेंचा अजित दादांना सवाल

मुंबई | Mumbai
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष छळाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यातले वातावरण तापले आहे. दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड हाच या हत्याकांडाचा मास्टरमाईंड असल्याने त्यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आजारी असल्याचे कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा दिल्याची मोघम प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी तर अजित पवार यांचे म्हणणे खोडून काढत, विरोधाभासाकडे लक्ष वेधत टीका केली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे ट्विट केलेय. दुसरीकडे अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी नैतिकतेवर राजीनामा दिल्याचे म्हटले. पण धनंजय मुंडेंच्या ट्विटमध्ये नैतिकतेमधील न चा ही उल्लेख केलेला नाही. हा किती मोठा विरोधाभास आहे. एकीकडे नैतिकतेवर राजीनामा दिल्याचे म्हटले जातेय अन् दुसरीकडे वैद्यकीय कारण मुंडेंनी दिलेय. यातून मोठा विरोधाभास दिसतो,” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे म्हणणे खोडून काढले आहे. सुप्रिया सुळे एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी थेट मोबाईल उघडून मुंडेंचे ट्विट दाखवत यात कुठे नैतिकतेचा मुद्दा आहे? असा सवालच केला.

- Advertisement -

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचे म्हटले होते. पण सुप्रिया सुळे यांनी अजितदादा कसे खोटे बोलत आहेत हे मुंडे यांचे ट्विट दाखवत स्पष्ट केले. त्यानंतर आज अजित पवार यांनी अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री असूनही विधानसभेत जाणे टाळले. तसेच नंतर मीडियाशी बोलणेही टाळले. अजितदादा यांचा चेहरा त्रासलेला होता. त्यांची बॉडी लँग्वेज बरेच काही सांगून जात होती. संतोष देशमुख प्रकरणामुळे अजितदादा गटाची प्रचंड बदनामी झाल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते चिंतीत असल्याचेही सांगितले जात आहे. मुंडेंचा राजीनामा आधीच व्हायला हवा होता, असेही हे नेते म्हणताना दिसत आहेत.

“हे सर्व भयानक आहे. आज ८४ दिवस झाले आहेत या गोष्टीला. या प्रकरणातल्या चार्जशीटमधील फोटो हे सरकारने आधीच पाहिलेले असणार. त्यातील फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहिले असतील ना? मग राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लागला?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी विचारला. “सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी सिडीआर समोर आणलेले आहेत. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचा संवाद हत्येच्या अर्धा तासांमध्ये झालाय, याचा अर्थ काय काढायचा आम्ही? ८४ दिवस याकडे कानाडोळा केला. आता काय म्हणतात नैतिकतेवर राजीनामा दिला?” असा सवाल सुप्रिया यांनी उपस्थित केला.

धनंजय मुंडेंनी ट्विटमध्ये काय म्हंटले आहे?
“बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे,” असे धनंजय मुंडेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...