Wednesday, April 9, 2025
HomeराजकीयSupriya Sule : “…तोपर्यंत मी अन्नत्याग करेन”; भर उन्हात सुप्रिया सुळेंचं आंदोलन,...

Supriya Sule : “…तोपर्यंत मी अन्नत्याग करेन”; भर उन्हात सुप्रिया सुळेंचं आंदोलन, कारण काय?

पुणे । Pune

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या तीन तासांपासून त्या कडक उन्हात बसून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांनी हे आंदोलन भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अत्यंत खराब अवस्थेविरोधात केलं आहे. हा रस्ता सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून भाविकांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. परिणामी, नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याचं चित्र आहे.

संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवरच खासदार सुळे यांनी स्वतः मैदानात उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.

गंभीर म्हणजे, सुप्रिया सुळे हे आंदोलन उन्हाच्या कडाक्यात सुरू असताना अजूनही कोणताही वरिष्ठ शासकीय अधिकारी किंवा प्रतिनिधी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी आलेला नाही. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी शिवभक्त आहे. आमच्या बनेश्वर मंदिरासाठी कितीही वेळ उन्हात बसायला तयार आहे. महात्मा गांधी आणि विनोबाजींचे विचार मला मार्गदर्शक आहेत. त्यामुळे शांततेच्या मार्गाने आम्ही आमचा हक्क मागतो आहोत. जोपर्यंत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वर्क ऑर्डर निघत नाही, तोपर्यंत मी ठिय्या आंदोलनावर ठाम राहणार आहे. बाकी सगळी पांडुरंगाची इच्छा… पण आम्हाला आमच्या नागरिकांसाठी योग्य रस्ता हवा आहे.”

सुप्रिया सुळे यांचं हे थेट आंदोलन आता राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या थेट रस्त्यावर उतरून नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढा देत आहेत. त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

भोर तालुक्यातील रस्त्यांची अवस्था, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि त्याकडे प्रशासनाचं होणारं दुर्लक्ष हे गंभीर बाबी आहेत. सुप्रिया सुळे यांचं आंदोलन केवळ एक राजकीय कृती नसून, ते जनतेच्या सुरक्षिततेच्या मागणीसाठी उचललेलं पाऊल आहे. आता पाहावं लागेल की जिल्हा प्रशासन यावर लवकरात लवकर निर्णय घेतं का, की हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Heat News : नाशिककरांना कडक उन्हाचे चटके; पारा ४२ अंशांवर

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राज्यात सूर्य आग ओकू लागल्याने वाढत्या तापमानामुळे (Temperature) नागरिकांची अंगाची लाहीलाही होतांना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा पारा ३५...