Wednesday, February 4, 2026
Homeराजकीयसुप्रिया सुळेंच्या 'त्या' वक्तव्यावर भाजपची बोचरी टीका

सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपची बोचरी टीका

मुंबई । Mumbai

दिंडोरी (खेडगाव) येथे शनिवारी महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

कार्यक्रमादरम्यान मांसाहाराच्या सेवनाविषयी बोलताना सुळे म्हणाल्या, “माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं. मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आम्ही आमच्या पैशांनी मटण खातो, आम्ही कोणाचे मिंधे नाही. खाल्लं तर काय पाप केलं का?” असे थेट शब्दांत त्यांनी भाष्य केले. त्यांच्या या विधानामुळे आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.

YouTube video player

सुळे यांच्या वक्तव्यावर भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, “कोणी काय खावं हा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, वारकरी परंपरेचा सन्मान करणे ही जबाबदारी आहे. पिढ्यानुपिढ्या शाकाहाराचे पालन करणाऱ्या वारकऱ्यांच्या आराध्य दैवताला मांसाहार मान्य आहे, असे म्हणणे हा मूर्खपणा आहे. तुम्ही परंपरेचा सन्मान करू शकत नसाल, तरी अपमान करू नका.” भोसले यांनी यापुढे अधिक बोचरी टीका करत म्हटले की, “मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी काय अपेक्षा करणार?” त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

सुळे यांनी आपल्या भाषणात केवळ मांसाहारावरच भाष्य केले नाही, तर पुरोगामित्वाचाही मुद्दा उपस्थित केला. त्या म्हणाल्या, *”50 वर्षांपूर्वी शरद पवार एका मुलीवर थांबले. स्वतःचे ऑपरेशन केले, पण पत्नीचे नाही. हेच खरं पुरोगामित्व आहे.” अशा शब्दांत त्यांनी आपल्या पक्षाच्या पुरोगामी विचारसरणीवर भर दिला. सुळे यांच्या वक्तव्यामुळे वारकरी परंपरेचा सन्मान आणि वैयक्तिक आहाराच्या सवयी यावर आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपने केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून काय उत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : शिर्डीत भाविकांची लूट करणार्‍या एजंटांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकांची (Devotee) अडवणूक करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणार्‍या एजंटांच्या (Agent) मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. भाविकांची...