Monday, May 27, 2024
Homeजळगावखा.सुप्रिया सुळे यांचा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न

खा.सुप्रिया सुळे यांचा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न

जळगाव – Jalgaon

महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन आयोग व सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे प्रश्न‍ आठवडाभराच्या आत सुटण्याच्या दृष्टीने राज्याचे वित्त व नियोजन मंत्री, वित्त विभागाचे सचिव, उच्च व तंत्र शिक्षण राज्य मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव यांच्यासह महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त बैठक येत्या दोन तीन दिवसात निश्चित करते व हे प्रश्न लवकर सुटावेत या दृष्टीने मी पाठपुरावा करते, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आज व्हीडीओ कॉलवरून दिले.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशान्वये विद्यापीठातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या तिन्ही संघटनांच्या सदस्यांनी आज सलग तीसऱ्या दिवशी विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराजवळ द्वारसभा घेऊन निदर्शने करित शासनाच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात घोषणा दिल्या.

त्यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे महानगर सचिव अॅड कुणाल पवार, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी आंदोलनास पाठींबा दिल्याचे जाहीर केले. त्यावेळी अभिषेक पाटील यांनी खा.सुप्रियाताई सुळे यांच्याशी व्हीडीओकॉलद्वारे करून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसह सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले दोन शासन निर्णय पुनर्जिवित करणे, १०,२० व३० वर्षांच्या सेवेनंतरची तीन लाभांची योजना लागू करण्यासंदर्भात वित्त, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री, सचिव व कृती समितीच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक २९ किंवा ३० सप्टेबर रोजी आयोजित करण्याच्या संदर्भात त्यांनी वित्त मंत्र्यांच्या विशेष कार्यआधिकारी यांच्याशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाच्या पुर्ततेसाठी स्वत: अजितदादा यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी होईपर्यंत पाठपुरावा करीन अशी ग्वाही दिली.

यावेळी अभिषेक पाटील यांनी विद्यापीठात ठिय्या आंदोलनात सहभागी कर्मचारी व अधिकाऱ्यांना संबोधित केले की, राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने राज्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयातील संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून संबंधित मंत्र्यांना वस्तुस्थिती निदर्शनास आणून देऊन प्रत्येक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने कृती समितीसमवेत सातत्याने पाठपुरावा केला जाईल, व त्या संदर्भातील जबाबदारी माझ्यासह अॅड कुणाल पवार व स्वप्निल नेमाडे यांच्यावर सोपवितो असे सांगीतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या