Saturday, July 4, 2026
Homeक्राईमKopargaon : सुरेगावात 22 किलो गांजाची झाडे जप्त

Kopargaon : सुरेगावात 22 किलो गांजाची झाडे जप्त

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon

राज्यात अमली पदार्थांविरोधात (Drugs) पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात असताना तालुक्यातील सुरेगाव गावठाण (Suregaon) येथे कोपरगाव तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत गांजाची जिवंत झाडे जप्त (Cannabis Trees Seized) केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड (Cannabis Cultivation) उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून, अमली पदार्थांच्या अवैध लागवडी विरोधातील ही तालुका पोलिसांची महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.

- Advertisement -

पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे सुरेगाव गावठाण येथे छापा (Raid) टाकण्यात आला. कारवाईदरम्यान गांजाची जिवंत झाडे (Cannabis Trees) आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या झाडांचे वजन केले असता ते 22 किलो भरले. त्याची अंदाजे किंमत 3 लाख 31 हजार 500 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी संजय महीपत रजपूत (वय 45) रा. सुरेगाव, ता. कोपरगाव याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान ही लागवड किती दिवसांपासून सुरू होती, यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या गांजाची विक्री अथवा तस्करी (Smuggling) केली जात होती का? याचा सखोल तपास कोपरगाव तालुका पोलिसांकडून सुरू आहे. तसेच आपल्या परिसरात कुणी गांजाची शेती करीत असेल किंवा गांजा विक्री करत असेल किंवा गांजा ओढत असेल तर अशा व्यक्तींची माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ, जयदीप गवारे, राम खारतोडे आदींसह पथकाने केली.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 210 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 449 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...